sakal
नाशिक

Crop Insurance : पीकविम्याची अग्रीम रक्कम देण्यासाठी विमा कंपनीने मागितली एक महिन्याची मुदत

सकाळ वृत्तसेवा

Crop Insurance : जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतून पंचवीस टक्क्याची अग्रीम रक्कम एक महिन्यात अदा करण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनी यांनी दिले होते. (insurance company asked for period of one month to pay advance amount of crop insurance Nashik news)

शेतकरी प्रीमियम मधील एक रुपया वजा जाता उर्वरित विमा रक्कम राज्य शासनाकडून मिळाली नसल्याने आयआरडीएआय ॲक्टमधील ६४ व्हीबी तरतूदीचे पालन न झाल्याने नुकसान भरपाई देण्यास बाध येत असल्याने प्रीमियमची सर्व रक्कम आणि विमा हप्ता प्रथम अनुदान प्राप्त झाल्यावर नुकसान भरपाई देण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली जावी अशी विनंती ओरिएंटल विमा कंपनीने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पत्राद्वारे केली आहे.

यामुळे एकवीस दिवसापेक्षा जादाच्या कालावधीत पाऊस न झालेल्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आता पंचवीस टक्क्याची अग्रीम रक्कम मिळण्यास विलंब लागणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली मुदत २९ सप्टेंबरला संपल्यानंतर ओरिएंटल विमा कंपनीच्या पुणे येथील विभागीय कार्यालयाने अग्रीम रक्कम देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना पत्र देत पिकांच्या नजर अंदाजित नुकसान ठरविण्यात जास्त अचूकता येण्यासाठी केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना विचारात घेतलेले नाहीत आणि अनुमानित हानीची सर्वेक्षण प्रक्रिया नीट राबवली नाही.

तसेच अधिसूचनेमध्ये तंत्रज्ञानावर आधारीत नुकसान भरपाई ठरविण्याचा अवलंब केलेला नाही. शेतकरी प्रीमिअम मधील एक रुपया वजा जाता उर्वरित विमा रक्कम राज्य शासनाकडून मिळाली नसल्याने अग्रीम रक्कम अदा करण्यासाठी तीस दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळावा असे पत्रात नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT