Farmer Crop Insurance : राज्य सरकारने एक रुपयात खरीप पिकांच्या विमा योजनेची अंमलबजावणी केली आणि योजनेत सहभागी होण्याची वाढीव मुदत गुरुवारी (ता. ३) संपली.
या कालावधीत यंदा आजअखेर राज्यात पेरलेल्या एक कोटी ३० लाख ६५ हजार २५७ हेक्टर क्षेत्रापैकी ८६ टक्के म्हणजे एक कोटी १२ लाख ४२ हजार ५६४ हेक्टरवरील पिकांचा विमा शेतकऱ्यांनी उतरवला.
गेल्या वर्षी ९६ लाख ६२ हजार २६१ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला होता. त्या तुलनेत यंदा १७५ टक्के अधिक म्हणजे, एक कोटी ६९ लाख ४८ हजार ७९० शेतकऱ्यांनी योजनेला प्रतिसाद दिला. (Insurance protection for 86 percent of Kharif crops in state nashik news)
पावसाने राज्यात हजेरी लावली असली, तरीही पुणे आणि नाशिक विभागात वरुणराजा म्हणावा तितका प्रसन्न झालेला नाही. त्यातच पावसाने उघडीप दिल्याने पिकांच्या वाढीवर काही भागात विपरीत परिणाम झाला असून, खरीप वाया जातो की काय? अशा शंकेची पाल शेतकऱ्यांमध्ये चुकचुकू लागली आहे.
राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आजअखेर १०३.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यात कोकण विभागातील १२२.८, नाशिक विभागातील ७२.५, पुणे विभागातील ७०.९, औरंगाबाद विभागातील ९६.९, अमरावती विभागातील १०२.७, नागपूर विभागातील १०६.६ टक्के पावसाचा समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकांना ५४ हजार ४३८ कोटी नऊ लाख रुपयांच्या विम्याच्या दिलेल्या कवचाला महत्त्व प्राप्त झाले आहे. उसाचे क्षेत्र वगळता राज्यात आजअखेर खरिपाच्या सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ९२ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
पीकनिहाय पेरणीच्या क्षेत्राची टक्केवारी अशी : भात-७७, ज्वारी-३६, बाजरी-४७, रागी-६८, मका-९२, तूर-८२, मूग-४१, उडीद-५९, भूईमूग- ६७, तीळ- २७, कारळे- ३३, सूर्यफूल-१२, सोयाबीन-११६, कापूस-९८.
राज्यातील पीकविम्याची स्थिती
राज्यातील पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांपैकी पाच लाख ७६ हजार ८६४ शेतकरी कर्जदार, तर एक कोटी ६३ लाख ७१ हजार ९२६ शेतकरी बिगरकर्जदार आहेत. शेतकऱ्यांनी एक रुपयाप्रमाणे एक कोटी ६९ लाख ५२ हजार ३८५ रुपये भरले आहेत.
राज्याचा हिस्सा चार हजार ७५५ कोटी ३० लाख, केंद्राचा हिस्सा तीन हजार २१६ कोटी २८ लाख असे एकूण सात हजार ९७३ कोटी २७ लाख रुपये पीकविमा उतरवणाऱ्या कंपन्यांना हप्त्यापोटी मिळणार आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आकडे बोलतात...
(क्षेत्र हेक्टरमध्ये आणि सहभागी शेतकऱ्यांची संख्या दर्शवते)
विभागाचे नाव शेतकऱ्यांचा गेल्या वर्षीचा सहभाग यंदाचा शेतकऱ्यांचा सहभाग पीकविमा संरक्षित क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र
कोकण ८४ हजार ८३८ २ लाख ८६ हजार ३७५ १ लाख ५४ हजार ७३ ३ लाख ३१ हजार ९६२
नाशिक ४ लाख ३३ हजार ५०० १४ लाख १० हजार ७२ १२ लाख ७ हजार ७१२ १८ लाख ८४ हजार ७५१
पुणे ४ लाख ३० हजार ४५० २० लाख ७२ हजार २३३ १३ लाख २० हजार २१० ९ लाख ३१ हजार ४८८
कोल्हापूर ३५ हजार ५३३ ७ लाख ७ हजार ७५० ३ लाख १७ हजार ४५१ ५ लाख ५५ हजार ५३८
औरंगाबाद ३१ लाख ५८ हजार १५ ४० लाख १४ हजार ७०४ १८ लाख ६१ हजार ६०२ १९ लाख ५८ हजार ६८०
लातूर ३६ लाख ३० हजार ८४६ ४० लाख ९० हजार ५३१ २७ लाख ८० हजार ५४३ २६ लाख ८२ हजार ८५३
अमरावती १५ लाख ९१ हजार ५६४ २९ लाख ४१ हजार २५४ २४ लाख ३६ हजार ३३८ ३० लाख ३३ हजार ८३६
नागपूर २ लाख ९७ हजार ७१५ १४ लाख २५ हजार ७१ ११ लाख ६४ हजार ६३५ १६ लाख ५६ हजार १५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.