Maharashtra Police esakal
नाशिक

SAKAL Special: रिकाम्या हातांना कामासाठी ‘मदतीचा एक हात’!

‘एकलव्य उद्योजकता कौशल्य’तून पोलिस कुटूंबियांसाठी बिनव्याजी कर्ज

नरेश हाळणोर

SAKAL Special : उच्च शिक्षण घेऊनही हाताला रोजगार मिळेलच याची शाश्‍वती नाही. कोरोना काळात तर अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. तरीही उद्योग-व्यवसायापेक्षा तरुणांचा नोकरी करण्याकडेच कल असतो.

परंतु, वाढती स्पर्धा आणि अपुऱ्या नोकऱ्यांमुळे साऱ्यांच्या पदरी नोकरी असेलच असे नाही. यामुळे बेरोजगारीच्या विळख्यात अडलेल्या पोलीस कुटूंबियांतील सदस्यांच्या रिकाम्या हातांना काम देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने ‘मदतीचा एका हात’ दिला आहे. मात्र, बहुतांश पोलीस कर्मचाऱ्यांनाच या योजनेची माहिती नाही. (Interest free loan for police families through Eklavya Entrepreneurship Skills nashik)

पोलीस कुटूंबियांना उद्योग-व्यवसायातून चालना मिळावी, यासाठी ‘एकलव्य उद्योजकता कौशल्य’च्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. त्याद्वारे पोलीस कुटूंबांतील तरुण, महिलांना स्वत:चा हक्काचा रोजगार सुरू करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

महाराष्ट्र पोलीस दलामार्फत पोलीस वेल्फेअर फंड संकलित केला जातो. याअंतर्गत पोलीस दलाकडून ‘एकलव्य उद्योजकता व कौशल्य’ ही योजना गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.

पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटूंबातील सदस्यांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे, हा त्यामागचा उद्देश आहे. पोलीस पत्नीला घरकामासह गृहउद्योगाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते.

अटी अन्‌ शर्थीही

‘एकलव्य उद्योजक व कौशल्य योजने’च्या माध्यमातून एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज तत्काळ उपलब्ध करून दिले जाते.

या योजनेचा लाभ महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक, कार्यालयीन लिपिक, कर्मचारी व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना घेता येऊ शकतो. योजनेच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नीसह १८ वर्षांवरील मुलगा व मुलीला कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यामुळे भांडवलाअभावी कोणाला उद्योग-व्यवसाय सुरू करण्यास अडचण असेल, तर अशावेळी ‘एकलव्य’च्या माध्यमातून रिकाम्या हातांना रोजगाराची संधी उपलब्ध आहे.

अधिकाऱ्यांच्या वेतनातून फंड

महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ‘पोलीस वेल्फेअर’ हा एक स्वतंत्र विभाग आहे. यासाठी शासनाच्या माध्यमातून कोणताही आर्थिक निधी उपलब्ध होत नसतो. तर, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेतनातून ठराविक रक्कम दर तीन महिन्यातून एकदा कपात केली जाते. तो फंड पोलीस वेल्फेअरमध्ये संकलित केला जातो. याच योजनेतून ‘एकलव्य’ ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

"पोलीस वेल्फेअर फंडातून राबविली जाणारी एकलव्य उद्योजकता व कौशल्य ही एक चांगली योजना आहे. बहुतांश पोलीस कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती नसावी. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. पोलीस कुटूंबियांनी या योजनेतून लहानशा का होईना उद्योगाला प्रारंभ करावा. तरुणांना आपल्या व्यवसायाला सुरुवात करता येऊ शकेल."

-अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : 'तुम्ही मला आशीर्वाद दिला नसता, तर मी आमदार-मंत्री झालोच नसतो'; असं का म्हणाले मुश्रीफ?

"त्याने त्याच्या मुलाला एक फोन केलेला नाही" ; 'इस प्यार को..'फेम अभिनेत्रीचा एक्स नवऱ्यावर आरोप, म्हणाली...

Dhule City Assembly Constituency : अनिल गोटे शिवबंधनात; ठाकरेंनी दिला एबी फॉर्म! मातोश्रीवर प्रवेश; धुळे शहराची उमेदवारी

Donald Trump Vs Kamala Harris: अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक अटीतटीची

कलर्सच्या नव्या मालिकेचं प्रसारण रखडलं; प्रेक्षकांनी रोष व्यक्त करताच वाहिनीने मागितली माफी, पोस्ट करत लिहिलं-

SCROLL FOR NEXT