Nashik Election 2022 esakal
नाशिक

नाशिक : प्रभाग पालकमंत्र्यांचा, यश शिवसेनेचे अन् धडपड भाजपची

विक्रांत मते

नाशिक : नाशिक रोड, नाशिक व सिडको भागाला जोडल्या जाणाऱ्या गोविंदनगरचा या प्रभागात समावेश होतो. पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे निवासस्थान या भागात असले तरी आतापर्यंत शिवसेनेच्याच (Shivsena) पारड्यात यश पडले आहे. यंदा आघाडी म्हणून पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप होईलच. स्थान पक्के करण्यासाठी भाजपची (BJP) धडपड या भागात राहील.

(स्व.) कल्पना पांडे व कल्पना चुंभळे यांच्या रूपाने या प्रभागावर शिवसेनेची छाप आहे. मागील टर्ममध्ये प्रवीण तिदमे यांनादेखील धनुष्यबाणावरच यश मिळाल्याने शिवसेनेचे हक्काचे जे काही ठराविक पॉकेट्स आहे, त्यात गोविंदनगर भागाचा समावेश करता येईल. यापूर्वीदेखील शिवसेनेच्याच मागे हा भाग भक्कमपणे उभा राहिला. पालकमंत्र्यांचे निवासस्थान असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) यश मिळाले नाही. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारासाठी पालकमंत्री विशेष आग्रही राहतील. पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांची मुलगी रश्‍मी या प्रभागातून नशीब अजमावणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या अनुषंगाने आमदार हिरे यांची कसोटी या भागात लागेल. पन्नासहून अधिक खासगी रुग्णालये, नव्याने उदयाला येत असलेले बिझनेस सेंटर, नाशिक, नाशिक रोड, सिडको, मुंबई नाका या भागाला जोडणारे रस्त्यांचे जाळे या महत्त्वाच्या बाबी या प्रभागाचे वैशिष्ट दर्शविणारे आहे. बॅंका, सरकारी, व खासगी कार्यालयांमध्ये काम करणारा उच्चभ्रू वर्ग येथे सापडेल तेवढ्याच संख्येने कारखान्यांमध्ये काम करणारा कामगार वर्गदेखील येथे आहे. दोन्ही मतदारांचे कॉम्बिनेशन किंवा बॅलन्स करणारे विजयपथावर राहील.

हे आहेत इच्छुक

राजेंद्र महाले, कल्पना चुंभळे, प्रवीण तिदमे, अश्‍विनी बोरस्ते, रश्‍मी हिरे-बेंडाळे, कैलास चुंभळे, सुरेखा नेरकर, अक्षय खांडरे, जगन पाटील, सीमा बडदे, सुनीता रणाते, रवींद्र पाटील, राम पाटील, शैलेश साळुंखे, ॲड. अजिंक्य गिते, शिल्पा पारनेरकर, यशवंत नेरकर, राहुल गणोरे, अभय गवळी, शिवाणी पांडे, सागर मोटकरी, अमर वझरे, शाहरुख शेख, शीतल वसावे, स्वप्नील पांगरे, प्रवीण मोरे, बाबासाहेब गायकवाड, चारुशिला गायकवाड, हरीश पांगरे, संगीता पाटील, सोनाली ठाकरे.

प्रभागाची व्याप्ती

गोविंदनगर, कर्मयोगीनगर, कालिका पार्क, खांडरे मळा, बडदेनगर, सिडको- लेखानगर, लक्ष्मीनगर, भुजबळ फॉर्म, बालभारतीमागील झोपडपट्टी परिसर, अचानक चौक, लाइफ केअर हॉस्पिटल, अनमोल नयनतारा.

* उत्तर- उंटवाडी पुलापासून पूर्वेकडे नंदिनी नदीने दक्षिणेकडील बाजीराव तिडकेनगर, जगतापनगर, गोविंदनगर तसेच मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील नंदिनी नदीवरील पुलापर्यंत.

* पूर्व- मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील नंदिनी नदीवरील पुलापासून दक्षिणेकडे नाशिक मुंबई- आग्रा महामार्गाने पश्चिमेकडील भाग घेऊन अग्निशमन केंद्रासमोरील रस्त्यापर्यंत.

* दक्षिण- मुंबई- आग्रा महामार्गावरील अग्निशमन केंद्रासमोरील रस्त्यापासून हॉटेल बागलाण, आदर्श ट्रेडर्स समोरील राणाप्रताप चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत. पश्चिमेकडे महाराणा प्रताप चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सती आसरा मंदिरापर्यंत, उत्तरेकडील रस्त्याने साईकुंज अपार्टमेंटपर्यंत, डावीकडे हेमकुंज सोसायटी व श्रीनाथ समर्थ सर्व्हिसेस वगळून महाराणा प्रताप चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील महाराष्ट्र शासन फ्रूट वेअरपर्यंत, कुशल टेक्नॉलॉजी समोरच्या रस्त्याने पुढे दत्त मंदिरापर्यंत, दत्त मंदिरापासून डावीकडे जाऊन आर्यावतच्या दोन इमारतींच्या मधून मळे परिसरातून सिडको हद्दीपर्यंत.

* पश्चिम- सिडको हद्दीने मळे परिसर घेऊन पुढे सदाशिव लीला अपार्टमेंट, आम्रपाली हाईट्स, नवत्रायस ट्रेडर्स, गुणातलत अपार्टमेंट , मनोदय अपार्टमेंट वगळता उत्तरेकडे दत्तगुरू रो हाऊसेस, अठरा मीटर डीपी रस्त्यापर्यंत, श्रीमती सरस्वती गुलाबराव पाटील विद्यालयासह उत्तरेकडील रस्त्याने पूर्वेकडील भाग घेऊन उंटवाडी गाव सोडून उंटवाडी रस्त्यापर्यंत पुढे नंदिनी नदीपर्यंत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT