BJP leaders troubled by stance of Shinde group Nashik esakal
नाशिक

Political News : ढवळाढवळ अन्‌ श्रेयवादाची लढाई! शिंदे गटाच्या भूमिकेमुळे भाजप नेते त्रस्त

विक्रांत मते

Nashik Political : राज्यात शिवसेनेच्या शिंदे गट व भाजपची युती होऊन सरकार स्थापन झाले असले तरी नाशिक शहरात मात्र दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे.

निवडणुकीपर्यंत हा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता असून त्याच अनुषंगाने एकमेकांच्या प्रभागातील ढवळाढवळ व कामांचे श्रेय लाटण्यासंदर्भातील तक्रारी भाजपच्या वरिष्ठांपर्यंत पोचविण्यात आल्याचे बोलले जात आहे. (Interference battle BJP leaders troubled by stance of Shinde group Nashik Political news)

मागील वर्षाच्या जून महिन्यात राज्यात शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या मदतीने सरकार स्थापन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना पक्षावरच दावा केला. निवडणूक आयोगाने तर धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांच्या पक्षाला दिले.

एकीकडे राज्यात सत्ता संघर्ष सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटना बळकट करण्याकडे लक्ष दिले. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत येणाऱ्या माजी नगरसेवकांना आर्थिक बळ दिले जात आहे.

शिंदे गटातील माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये विविध विकासकामांसाठी निधी देणे, त्याचप्रमाणे शहरातील धोरणात्मक विषयासंदर्भात निर्णय घेऊन त्याचे श्रेय लाटण्याचे सध्या प्रकार सुरू आहे.

आगामी महापालिका निवडणुकीमध्ये युती होईल का नाही, हे अद्याप सांगता येत नसले तरी भाजपचे माजी नगरसेवक किंवा पदाधिकारी पूर्वीपासून ज्या भागात काम करत आहे तेथे शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार जोरकसपणे प्रयत्न करत असल्याने तेथे वाद निर्माण होत आहे.

असे जवळपास 15 ते 16 प्रभाग आहे, जिथे भाजपचे नगरसेवक असून तेथे शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. अशा ठिकाणी वाद निर्माण होत आहे.

आमदारांमध्ये खदखद

गंगा आरतीच्या धर्तीवर गोदावरी आरतीसाठी भाजपकडून प्रयत्न होत आहेत. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बैठक होऊन गोदावरी आरतीसाठी निधी देण्याचेदेखील निश्चित झाले असताना खासदार हेमंत गोडसे यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.

त्यातून भाजपमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाबद्दल संताप व्यक्त होत आहे. पूर्व विधानसभा मतदारसंघात मखमलाबाद येथे स्थानिक आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्याकडून निधी मंजूर झाला असताना खासदार गोडसे यांच्याकडून खासदार निधीचे बोर्ड लावले गेल्याने तेथेही संघर्ष पाहायला मिळाला.

क. का. वाघ महाविद्यालयासमोर बांधण्यात आलेला उड्डाणपूल, गोविंदनगर येथील बोगदा विस्तारीकरण याचे श्रेयदेखील खासदार गोडसे यांच्याकडून घेतले जात आहे. त्यामुळे आमदारांमध्ये खदखद निर्माण झाली आहे.

मनपा कामकाजावर शिंदे गटाचे वर्चस्व

दत्तमंदिर ते द्वारका यादरम्यान डबलडेकर उड्डाणपुलाची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. त्याचेदेखील श्रेय शिंदे गटाकडून घेतली जात आहे. नाशिक रोडमध्ये बिटको परिसरात चार माजी नगरसेवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटाची वाट धरली.

मात्र तेथे विद्यमान भाजपचे चार माजी नगरसेवक असल्याने तेथे भाजपसाठी शिंदे गट डोकेदुखी ठरू लागला आहे. अशीच परिस्थिती पाथर्डी फाटा, गंगापूर रोड, वडाळा, कामटवाडे परिसर व इंदिरानगर भागात आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

नाशिक शहरामध्ये भाजपचे तीन आमदार आहे असे असले तरी महापालिकेच्या कामकाजावर मात्र शिंदे गटाच्या नेत्यांचे वर्चस्व ही बाबदेखील भाजपच्या नेत्यांना खटकत आहे. महापालिका आयुक्तांसह महापालिकेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांवरदेखील शिंदे गटाच्या नेत्यांचा पगडा असून, भाजपच्या आमदारांसह वरिष्ठ नेते व माजी नगरसेवकांनादेखील अधिकारी जुमानत नसल्याची भावना निर्माण झाली आहे.

अंतर्गत खदखद वरिष्ठांपर्यंत

शिंदे गटाकडून सुरू झालेल्या श्रेयवादाची खदखद भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचविण्यासाठी एक गट कार्यरत झाला आहे. शिंदे गटाकडून अतिक्रमण होत राहिल्यास भाजपला परवडणारे नाही, अशी भावना प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोचवली जाणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी हीच संधी आहे. कोणाला काय वाटेल हे पाहत बसले तर संघटना वाढणार नाही, अशी भूमिका शिंदे गटाकडून घेण्यात आल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT