येवला (जि. नाशिक) : पिकांना भाव नाहीत, पण पिके जोमात असून पुरेशा प्रमाणात पाणीही उपलब्ध आहे. मात्र सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणे मुश्किल झाले आहे.
त्यामुळे नियमित आठ तास सुरळीत वीज पुरवठा करावा या मागणीसाठी मंगळवारी (ता. १७) येथील महावितरणच्या कार्यालयासमोर बल्हेगाव, गणेशपूर सुकी, वडगाव या तीन गावांतील शेतकऱ्यांनी आक्रमक होत ठिय्या आंदोलन केले.
दीड तासानंतर सुरळीत वीजपुरवठ्याचे आश्वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. (Intermittent power issue problem for farmers 8 hours smooth power demand Nashik News)
शासनाने शेतीसाठी आठ तास वीज पुरवठा देण्याचे जाहीर केले आहे. मात्र गेल्या दिड- दोन महिन्यांपासून सलग दोन-तीन तासही वीज पुरवठा मिळत नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे पिकांचे नुकसान होत आहेच;
परंतु विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत असून, या भागात मोठ्या प्रमाणात पैठणीचे हातमाग असल्याने पैठणी विणकामसुद्धा करणे मुश्किल झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांसह व्यावसायिकांनी या वेळी केल्या. संतप्त शेतकऱ्यांनी अचानक केलेल्या या आंदोलनामुळे व प्रश्नांची सरबत्ती झाल्याने अधिकाऱ्यांची धावपळ उडाली.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी आंदोलनात मध्यस्थी करत संबंधीतांना तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सुचना दिल्या. आंदोलकांतर्फे उपकार्यकारी अभियंता मिलींद जाधव यांना निवेदन देण्यात आले.
विद्युत पुरवठा पूर्ण दाबाने सुरळीत होईल, असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नाना पिंगळे, दत्ता जमधडे, विलास पिंगळे, दत्तात्रय वाणी, सचिन जाधव, अरूण कापसे, समाधान सोमासे, ज्ञानेश्वर जमधडे, राजेश निकाळे, अरूण लकारे, निलेश मलिक, बाबासाहेब जाधव, विजय कापसे, समाधान कांडेकर, दत्तात्रय जाधव, अशोक जमधडे, विजय कापसे, राकेश जमधडे, अण्णा जाधव, समाधान कांडेकर, जनार्दन जमधडे, संतोष सोमासे, मनोज पिंगळे, शिवाजी कापसे, दत्तात्रय जाधव आदींसह शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
"आम्ही विजबिले नियमित भरतो. त्यामुळे किमान आठ तास तरी नियमित वीज मिळाली पाहिजे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. याप्रश्न आम्ही आठ ते दहा वेळेस महावितरणच्या कार्यालयात तक्रारी करूनही न्याय मिळाला नाही. म्हणून आज आंदोलनाची भूमिका घेतली. एक तर शेतमालाला भाव नाही. त्यात वीज नसेल, तर पिके कसे जगतील हा प्रश्न असल्याने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. तात्पुरता नव्हे तर कायमस्वरूपी सुरळीत वीजपुरवठा करावा. अन्यथा यापुढे विंचूर चौफुलीवर आंदोलन करू."
-नानासाहेब पिंगळे, शेतकरी, बलेगाव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.