नाशिक : काही दिवसांपासून सत्ताधारी भाजपमध्ये (BJP) निर्माण झालेली बंडाळी, पक्षांतर्गत वाढलेली धुसफूस या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी चार पदाधिकाऱ्यांची पुणे येथे बैठक घेतली. महापालिका निवडणुका (nashik muncipal corporation) जवळ येत असताना, महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत वादाने कळस गाठला आहे. सभागृह नेता व गटनेत्यांची उचलबांगडी, पदाधिकाऱ्यांमधील वाद, गेल्या महिन्यात झालेल्या प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (ता. ३) पुणे येथे आमदार ॲड. राहुल ढिकले, स्थायी समिती सभापती गणेश गिते, शहराध्यक्ष गिरीश पालवे व माजी आमदार बाळासाहेब सानप यांना बोलावून घेतले. (internal-dispute-in-BJP-Currently-closed-marathi-news-jpd93)
पक्ष बदनामी थांबवून निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना
नाशिक रोड प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या शहराध्यक्षांसह गटनेत्यांना अभय देत पक्षाची बदनामी थांबवून निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा सल्ला पाटील यांनी दिला.प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत पंचवटीत बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र यांच्यासाठी ढिकले व गिते यांनी पुढाकार घेत उमेदवारी अर्ज माघारी घ्यावयास लावला. नाशिक रोड प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत सानप यांनी पुढाकार घेऊन भाजप उमेदवाराला मदत करणे अपेक्षित होते. मात्र, सानपसमर्थक विशाल संगमनेरे व सीमा ताजणे यांनी दांडी मारल्याने शिवसेनेच्या पदरात आपसूक सभापतिपद पडले. त्यानंतर भाजपमधील बंडाळी शिगेला पोचल्याचे स्पष्ट झाले. सानप यांच्यासह शहराध्यक्ष गिरीश पालवे व गटनेते अरुण पवार यांनी व्हीप न बजावल्याने त्यांची भूमिका संशयात सापडली. या पार्श्वभूमीवर कारवाईची मागणी होत होती. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे सविस्तर अहवाल सादर करण्यात आला होता. त्यामुळे कारवाईची शक्यता व्यक्त होत होती. पाटील यांनी पक्षाची बदनामी थांबविण्याचा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चौघांमध्ये निवडणुकीची चर्चा
आगामी महापालिका निवडणुकीच्या चर्चेसाठी पुण्यात प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी बोलाविल्याचे सांगण्यात आले. मात्र, निवडणुकीची तयारी करायची, तर पक्षात अन्य प्रमुख पदाधिकारी व आमदार असताना, त्यांना का बोलाविले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. पक्षांतर्गत वादाने टोक गाठल्याने त्या पार्श्वभूमीवर बैठक बोलाविण्यात आल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या भूमिकेनंतर सानप, पालवे व पवार यांच्यावर कारवाई न करता त्यांना अभय दिल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.