Dattu Bhokanal, Kavita Raut and Anjana Thamke esakal
नाशिक

Nashik News: आंतरराष्ट्रीय खेळाडूंना अद्याप नोकरी नाही! अधिवेशनात राज्य शासनाने दिलेले आश्वासन हवेत

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आंतरराष्ट्रीय स्पर्धांत देशाचा नावलौकिक उंचावणाऱ्या राज्यातील खेळाडूंना दोन महिन्यांच्या आत शासकीय नोकरीत सामावून घेतले जाईल, असे आश्वासन राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले.

या आश्वासनांना तीन महिने झाले तरी राज्य सरकारने याबाबत कुठलीही कार्यवाही न केल्यामुळे खेळाडूंच्या अपेक्षावर पुन्हा पाणी फिरले आहे. (International players still no job assurance given by state government not done yet Nashik News)

मार्च महिन्यात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजी मंत्री छगन भुजबळ यांनी खेळाडूंच्या नोकरीचा विषय उपस्थित केला. नाशिकचे आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत, दत्तू भोकनळ आणि अंजना ठमके या खेळाडूंनी जगभरात देशाचे नाव उज्ज्वल केले.

या खेळाडूंचा महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानदेखील केला आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार सुद्धा २०२० मध्ये दत्तू भोकनळ यांना प्राप्त झालेला आहे.

राज्य शासनाने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग या खेळाडूंना न्याय कधी मिळणार, असा प्रश्न त्यांनी सभागृहात मांडला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांनी दोन महिन्यात या खेळाडूंना नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले. परंतु, तीन महिने झाले तरी अद्याप कुठलीही प्रक्रिया झालेली नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शासन निर्णय काय सांगतो?

१ मे, २०११ च्या शासन निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंना ‘क्लास वन’ अधिकारी म्हणून शासकीय सेवेत सामावून घेतले जाते. शासन सेवेत थेट नियुक्तीची मानकदेखील निश्चित केलेली आहेत.

या शासन निर्णयातील वर्ग एक पदासाठी आवश्यक असलेले निकष या तिन्ही खेळाडूंनी पूर्ण केले आहेत, पण त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही.

आश्वासनांची आम्हाला सवय झाली

क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी आश्वासन दिल्यानंतर क्रीडा मंत्रालयाकडून आपल्याला विचारणा होईल किंवा आपण त्यासाठी तयार राहू, असे म्हणत खेळाडूंनी आपली फाइल तयार केली आहे. क्रीडा मंत्रालयाकडे त्यांचे संपूर्ण दस्तऐवज जमा झाले आहेत.

पण गेल्या तीन महिन्यांत या खेळाडूंना एकदाही विचारणा झालेली नाही. त्यामुळे आता त्यांनी अपेक्षा सोडली आहे. त्या दृष्टीने हा विषय फक्त आश्वासनांपुरता मर्यादित राहिल्याने त्याची जणू आम्हाला सवयच जडल्याची खंत खेळाडूंनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT