नाशिक : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागांतर्गत तयार करण्यात येणारे रस्ते चोरीला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहे. यात जिल्हा परिषदेची बदनामी होत आहे.
त्यामुळे तक्रारी आलेल्या रस्त्यांची थेट बाह्य यंत्रणेमार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. (Investigation of roads will now be done through external system Decision of ZP CEO Ashima Mittal Nashik News)
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मालेगाव तालुक्यातील टोकडे गावातील रस्ता तयार न करताच त्याची बिले अदा करण्यात आली होती. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी रस्ता चोरीला गेल्याची तक्रार करत रस्ता शोधून देणाऱ्याला लाखो रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी कार्यकारी अभियंत्यांमार्फत चौकशी करून घेतली. त्यानंतर या रस्त्याचा प्रश्न ‘जैसे थे ’आहे. यातच येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत धाव घेत, जर रस्ता आहे तर तो आमच्या जमिनीतून गेला असल्याची तक्रार केली.
त्यामुळे या रस्त्याचा गुंता वाढला. असे असतानाच इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील रस्ता असतानाही पुन्हा रस्ता करण्याची प्रक्रिया राबवून त्याची बिले देखील काढले असल्याची तक्रार सरपंचांनी कार्यकारी अभियंत्यांकडे केली होती.
याबाबत कारवाई न झाल्यान आंदोलन करण्याचा इशारा संबंधित सरपंच यांनी दिला. याबाबत, मित्तल यांना रस्ते चोरीच्या वाढत्या तक्रारींबाबत विचारणा केली. त्यावर मित्तल यांनी रस्त्यांच्या तक्रारी येत आहे.
हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली
त्याअनुषंगाने चौकशी देखील केली असता, टोकडे येथील रस्ता असल्याचे अहवालात नमूद असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर हा वाद मिटलेला नाही. यानंतर कुऱ्हेगावातील तक्रार आली आहे.
तक्रारी वाढत असल्याने आता जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याऐवजी बाह्य यंत्रणा जसे, की सार्वजनिक बांधकाम विभाग यातील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून या तक्रारींची निरसन केले जाणार असल्याचे मित्तल यांनी सांगितले.
कुऱ्हेगावातील राजकारण पोचले जिल्हा परिषदेत
दरम्यान, कुऱ्हेगावातील सरपंच यांनी रस्ते न करता बिल काढल्याची तक्रार केल्यानंतर गावातील उपसरंपच यांनी गावात रस्ता तयार झाला असल्याचे बांधकाम विभागास पत्र देऊन सांगितले आहे. त्यासाठी लागणारे सर्व पुरावे देखील बांधकाम विभागास सादर केले आहे. त्यामुळे गावातील राजकारण जिल्हा परिषदेपर्यंत येऊन पोचले असल्याची चर्चा सुरू आहे.
रस्त्यांची चौकशी सुरू
नव्याने रुजू झालेले बांधकाम विभाग एकचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी कुऱ्हेगावातील रस्त्यांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेतली आहे. या रस्त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने तेथील उपअभियंता यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. दोन दिवसांत अहवाल प्राप्त होईल, असे कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.