Officials of the association discussing with the officials about regular electricity esakal
नाशिक

Nashik News: शेतीवर अनियमित विजेचे संकट; दिक्षीतील शेतकऱ्यांचा वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव

सकाळ वृत्तसेवा

ओझर (जि. नाशिक) : निफाड तालुक्यातील दिक्षी, दात्याने, जिव्हाळे, थेरगाव, ओणे परिसरातील शेतीसाठी भारनियमन वगळता इतर वेळेत सुरळीत व सलग आठ तास वीज पुरवठा करावा यासाठी दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा का6ढत वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत ओझर ग्रामीणच्या सहायक अभियंता सुवर्णा मोरे यांना नियमित वीज पुरवठ्याबाबत निवेदन दिले.

तातडीने वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (Irregular electricity crisis on agriculture Farmers in Dikshi surrounded the electricity distribution officials Nashik News)

उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. तापमान वाढत आहे. द्राक्ष हंगाम सुरू झाला असून तापमान वाढल्यामुळे द्राक्ष, गहू, कांदा, भाजीपाला या पिकांना नित्यनियमाने पाणी द्यावे लागत आहे. मात्र, सातत्याने वीज पुरवठा खंडित होणे, वीज ट्रीप होणे, शॉर्टसर्किट होणे, देखभाली अभावी ट्रान्स्फॉर्मर जळणे, वीज तारा लोंबकळणे असे प्रकार होत आहे.

त्यामुळे शेतमालाचे नुकसान होत असून शेतकरी त्रस्त झालेले आहेत. सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यामुळे शेतमाल उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे याचा विचार करून आठ तास अखंडित वीज पुरवठा करावा अशी मागणी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केली.

या प्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन बोराडे, आनंदराव बोराडे, विनायक चौधरी, अरुण घुगे, डॉ. योगेश्वर चौधरी, देवीदास चौधरी, योगेश चौधरी, दशरथ वणवे, राजेंद्र आव्हाड, सुनील चौधरी, रावसाहेब चौधरी, वसंत चौधरी, भूषण धनवटे, अंबादास चौधरी, रंगनाथ गांगुर्डे, सुभाष हळदे, चंद्रभान हळदे, विक्रम चौधरी, ज्ञानेश्वर तांबडे, रामभाऊ चौधरी, प्रकाश कातकाडे, दिलीप धनवटे, संतू बोराडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

सुरळीत पुरवठा करण्याचे आश्वासन

परिसरातील अनेक शेतकरी नियमित कृषीपंपाचे बिल भरत असूनही अशी परिस्थिती होते हे योग्य नाही याशिवाय फिल्डवर काम करणाऱ्या मुजोर कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांसोबत सौजन्याने वागणे व बोलण्याबाबत सूचना द्याव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

तर सहायक अभियंता श्रीमती मोरे यांनी शेतकऱ्यांच्या भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून शेतीपंपांना सुरळीत वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. शेतीसाठी वीजपुरवठा सुरू असताना मेंटेनन्स ची कामे शक्यतो केली जाणार नाही असेही आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.

"सध्या तापमान वाढत आहे. द्राक्ष हंगाम सुरू झाला असून द्राक्ष बागेसह कांदा, गहू, भाजीपाला या पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. मात्र सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम होत आहे. सलग आठ तास सुरळीत वीजपुरवठा करावा."

- अर्जुन बोराडे, शेतकरी संघटनेचे नेते

"तांत्रिक कारणाव्यतरिक्त सर्व ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणार आहोत. तसेच, ग्राहकांनी अनधिकृतपणे आकडे टाकून किंवा मीटरमध्ये छेडछाड करून वीज वापर करू नये. अनधिकृतपणे वीज वापरामुळे ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे."

- योगेश्वर पाटील, उप कार्यकारी अभियंता, ओझर उपविभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT