Fraud esakal
नाशिक

Nashik Fraud Crime: आयटी कंपनीने थकविले दीड कोटींचे वीजबिल! चेन्नईस्थित संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : चेन्नईस्थित संशयितांनी नाशिकमध्ये आयटी कंपनी सुरू करण्यासाठी वासवानी रोडवरील फ्लॅट घेत करारानुसार ठरलेले वीजबिल न भरता तब्बल एक कोटी ६५ लाखांचे वीजबिल थकवून फसवणूक केली आहे.

सरकारवाडा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा तपासाकामी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. (IT company unpaid electricity bill of one half crore Fraud case against Chennai based suspects Nashik Fraud Crime)

लेकू रेड्डी राजगोपाल (वय ५८), मधुराम राजगोपाल (५५), अंजली राजगोपाल (३०), राजू जगन्नाथन‌ (४७), मनीष जोशी (४०, सर्व रा. मेन रोड, सिपकोट, आयटी पार्क, सिरुसेरी, चेन्नई) अशी फसवणूक करणाऱ्या संशयितांची नावे आहेत.

समीर माधवराव चव्हाण (रा. आर्या अपार्टमेंट, सुचितानगर, मुंबई नाका) यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी स्वामी एंटरप्राइजेस या नावाची आयटी कंपनी साधू वासवानी रोडवरील अंबिका अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक चार येथे सुरू केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चव्हाण यांच्या कंपनीमार्फत एमएसईडीसीएल व एमपीएसएल या कंपनीशी वीजसंदर्भात करार झाला होता. या करारांतर्गत ठरल्याप्रमाणे वीजमीटरचे रीडिंग घेऊन त्याचा मोबदला स्वामी कंपनीने देणे अपेक्षित होते.

परंतु संशयितांनी कमी मोबदला दिला. एक कोटी ६५ लाख ६२ हजार ३५७ रुपयांचे वीजबिल थकविले. कंपनीने त्यांचे कामकाज बंद करून थकीत बिल अदा न करता फसवणूक करीत पसार झाले. संबंधित प्रकार १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२३ या दरम्यान घडलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT