नाशिक : महापालिका (NMC) हद्दीतील रुग्णालयांना वर्षातून दोनदा फायर ऑडिट करणे बंधनकारक आहे.
परंतु शहरातील ४०१ रुग्णालयांनी फायर ऑडिट न करता रुग्णालये सुरू ठेवली आहे. (It has decided to cut electricity water supply to hospital Within municipal limits from March 1 if there is no fire audit nashik news)
त्या रुग्णालयावर १ मार्चपासून वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यात पूर्व, पश्चिम व सिडको विभागातील निम्म्याहून अधिक रुग्णालयांचा समावेश आहे. त्या खालोखाल पंचवटी विभागातील रुग्णालयावर कारवाई करण्याचे निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाकाळात खासगी व शासकीय रुग्णालयांना आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर राज्य शासनाने रुग्णालयांना फायर ऑडिट करणे बंधनकारक केले होते. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ व नियम २००९ हे ६ डिसेंबर २००८ नुसार दर सहा महिन्यांनी म्हणजे जानेवारी व जुलै महिन्यात अग्नी प्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था सुस्थितीत असल्याचा दाखला (फायर ऑडिट) मिळविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महापालिका हद्दीत १० फेब्रुवारीपर्यंत फायर ऑडिट करणे बंधनकारक करण्यात आले होते. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सूचना देवूनही ४०१ रुग्णालयांनी फायर ऑडिट केलेले नाही. १५ फेब्रुवारीपर्यंत ६४७ रुग्णालयांपैकी जेमतेम २४६ रुग्णालयांनीच फायर ऑडिट प्रमाणपत्र सादर केले.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
फायर ऑडिट बंधनकारक असल्याने ज्या रुग्णालयांनी फायर ऑडिट केले नसेल त्या रुग्णालयांना नोटिसा पाठविल्या जाणार आहे. त्यात रुग्णालयांचा पाणीपुरवठा, वीजपुरवठा खंडित केला जाईल, तर पोलिसांकडून इमारत सीलबंद केली जाणार आहे. वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई होईल. त्यानंतरही प्रमाणपत्र सादर न केल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे.
पूर्व व पश्चिम मध्ये सर्वाधिक रुग्णालये
पूर्व व पश्चिम विभागात एकूण २२६ रुग्णालये आहेत. त्यातील १०२ रुग्णालयांनी फायर ऑडिट केले, तर १२४ रुग्णालयांनी केलेले नाही. त्याखालोखाल सिडको विभागात १५१ रुग्णालये असून, त्यातील १०३ रुग्णालयांनी फायर ऑडिट केलेले नाही. ४८ रुग्णालयांनी केले आहे.
पंचवटी विभागात १२८ रुग्णालये असून यातील ३४ रुग्णालयांनी फायर ऑडिट केले तर ९४ रुग्णालयांनी केलेले नाही. नाशिक रोड विभागात ९२ रुग्णालये असून यातील ४३ रुग्णालयांनी फायर ऑडिट केले तर ४९ रुग्णालयांनी केलेले नाही. सातपूर विभागात ४७ रुग्णालयांपैकी १९ रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले तर २८ रुग्णालयांचे झालेले नाही.
"नियमानुसार वर्षातून दोनदा पंधरा मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींचे वर्षातून दोनदा ऑडिट बंधनकारक आहे. परंतु ४०१ रुग्णालय इमारतींनी प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे एक मार्च पासून कारवाई केली जाणार आहे." - संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.