Lamp festival held on the occasion of Devdeepavali at Jagdambamata temple esakal
नाशिक

Nashik: देवदीपावलीनिमित्त उजळले जगदंबामातेचे मंदिर! वणीत किन्नरपंथीय समुहाचे प्रमुख भास्कर गुरू यांची शिष्यांसह पूजा

सकाळ वृत्तसेवा

वणी : येथील जगदंबामाता मंदिरात देवदीपावलीनिमित्त किन्नरपंथीय समुहाचे प्रमुख भास्कर गुरू यांनी शिष्य व भाविकांसमवेत शेकडो दिवे प्रज्वलीत केले व फटाक्यांची आतिषबाजी केली. (Jagdambamata temple lit up on occasion of Devdeepavali Worship of Bhaskar Guru head of Kinnerpanthiya group in Vani with his disciples Nashik)

भास्कर गुरू यांनी सप्तशृंगी गडावर आदिमाया सप्तशृंगीदेवीस नवमहावस्त्र, खन-ओटी, फळे अर्पण करून महापूजा केली. नतर सभामंडपातील यज्ञ कुंडासभोवती शेकडो दीवे लावून दीपोत्सव केला.

त्यानंतर भास्कर गुरू सहकारी व शिष्यांनी वणीच्या जगदंबामाता मंदिरात येऊन महावस्त्र, ओटी-खन, पाच फळे, धान्य आदी अर्पण केले.यानंतर श्री जगदंबामाता मंदिर, सभामंडप, तलाव परिसरात संताजी युवक मित्र मंडळ व एकलव्य फ्रेंड सर्कलच्या सदस्यांच्या मदतीने पाच हजारावर दिवे प्रज्वलीत केले.

नंतर आदिमाया जगदंबेची महाआरती करण्यात आली. शोभीवंत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. जगंदबामाता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, विश्वस्त रवींद्र थोरात, राकेश थोरात, सुनील थोरात यांनी ट्रस्टतर्फे भास्कर गुरू यांचे स्वागत केले.

देवी मंदिर व सभामंडप, गणेश मंदिर, संतोषीमाता मंदिर, महादेव मंदिर, तलावाचा परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून गेला होता. हे दृश्य मोबाईलमध्ये टिपण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

दरम्यान, बुधवार (ता. १३)पासून मार्गशीर्ष मासारंभ झाला. मासाचा पहिला दिवस प्रतिपदा, तोच देव दिवाळी म्हणून साजरी केली जाते. आपण अश्विन- कार्तिक महिन्यांत दिवाळी साजरी करतो. तेव्हा चार्तुमास सुरू असतो. तेव्हा भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात.

कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात. त्यावेळी चार्तुमासही संपतो, म्हणून मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी साजरी केली जाते. त्यानिमित्त सर्व देवदेवतांचे स्मरण हा देवदिवाळीचा हेतू असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT