Devendra Fadanvis Nashik Daura : शासनाच्या जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) व जलयुक्त शिवार योजनांतर्गत ग्रामीण पातळीवर प्रचार व प्रसिद्धीसाठी तयार केलेल्या जलरथाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १०) होणार आहे.
कॉलेज रोडवरील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये शनिवारी दुपारी तीनला हा कार्यक्रम होईल. (Jagratha will be inaugurated by Deputy Chief Minister Fadnavis tomorrow in nashik news)
कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण आणि जनजातीय कार्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची प्रमुख उपस्थिती असेल.
राज्याचा पाणी व स्वच्छता विभाग, भारतीय जैन संघटना यांच्या समन्वयाने २०० पेक्षा जास्त चित्ररथांच्या (जलरथ) माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागात जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) व जलयुक्त शिवार योजनेची प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
राज्यातील चित्ररथांचा प्रारंभ नाशिक येथून होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे प्रकल्प संचालक दीपक पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.