Ghanshyam Pawar, Rajat Gawli, Saili Patil, Jeevan Mahire along with Mohan Ghongde giving information about the movie 'Jaitar'.  esakal
नाशिक

Jaitar Movie Realease : मालेगावात घडलेल्या सत्यघटनेवरील 'जैतर' 14 एप्रिल पासून सिनेमागृहात!

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : मालेगावात घडलेल्या सत्य घटनेवर संगीतमय प्रेम कहाणी असलेला 'जैतर' शुक्रवार (ता. १४) पासून महाराष्ट्रभर सर्वत्र प्रदर्शित होत असल्याची माहिती शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत चित्रपट निर्माते मोहन घोंगडे यांनी दिली.

सोनज (ता.मालेगाव) सारख्या ग्रामीण भागातील ध्येयवेड्या युवकाने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. (Jaitar marathi movie on real incident in malegaon releasing in theaters from April 14 nashik news)

यावेळी पत्रकारांना श्री. घोंगडे यांनी 'जैतर' या चित्रपटाबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थी दशेतील प्रेमीयुगुलाची, मालेगावात घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित गोष्ट आहे. जात- वर्ण, आर्थिकस्तर या गोष्टींवरून समाजात तेढ निर्माण होतात. त्याचे परिणाम पडसाद अनेकदा प्रेमप्रकरणात, लग्नादरम्यान उमटतात आणि प्रेमीयुगुलाला संघर्षाला तोंड द्यावे लागते.

ग्रामीण भागात या संघर्षाचे गंभीर परिणाम अनेक अंगाने मुलीला भोगावे लागतात. प्रामुख्याने तिच्या शिक्षणावर आणि एकूणच स्वातंत्र्यावर बंदी येते. चित्रपटाचे कथालेखक आणि निर्माते मोहन घोंगडे हे मूळ शेतकरी आहेत.

प्रेमप्रकरणातील 'त्या' सत्यघटनेत त्यांना एक गंभीर सामाजिक समस्या दिसली आणि त्यांचे संवेदनशील मन व्यथित झाले. त्या समस्येला वाचा फोडण्यासाठी त्यांनी जैतर ही कथा लिहिली आणि त्याला समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सिनेमा हे माध्यम निवडले व जैतर या सिनेमाची निर्मिती केली.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

गीतकार मंगेश कांगणे, विष्णू थोरे आणि योगेश खंदारे यांच्या रचनांवर संगीतकार योगेश खंदारे यांनी संगीतबद्ध केलेली गाणी हे या चित्रपटाचे बलस्थान आहे. गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजातील 'देव मल्हारी' हा गोंधळ खंडेरायाला आर्त हाक मारणारा, ताल धरायला लावणारा तर अवधूत गुप्ते यांनी गायलेले 'आधाराचं आभाळ' हे विरहगीत काळजाचा ठाव घेणारे आहे.

हर्षवर्धन वावरे-कस्तुरी वावरे या गायक दांपत्याने गायलेलं 'गुलाबी जहर प्रेमगीत मनाला रुंजी घालणारे तर संगीतकार योगेश खंदारे यांनी लिहिलेले, गायलेले 'होऊ दे कल्ला' हे मस्तीगीत बहार आणणारे आहे. चित्रपटाची पटकथा-संवाद आणि दिग्दर्शन घनश्याम पवार यांचे आहे. कागदावरचे दाहक वास्तव

मनोरंजनाच्या माध्यमातून दृश्यरुपात आणण्यात दिग्दर्शकाने त्यांचे कसब पणाला लावले आहे. कथानकाची गरज ओळखून चित्रीकरण खान्देशात केले आहे. चित्रपटात रजत गवळी आणि सायली पाटील दोन नवोदित कलाकार प्रमुख भूमिकेत असून गणेश सरकटे, गायत्री सोहम, अविनाश पोळ, रामेश्वर डापसे, अरुण गीते, स्मिता प्रभू, जीवन महीरे, माही वाघ, संग्राम साळवी सह इतर कलाकारांच्या भूमिका आहेत.

या पत्रकार परिषदेला दिग्दर्शक घनश्याम पवार, कलाकार रजत गवळी, सायली पाटील, जीवन महिरे यांचेसह बारा बलुतेदार मित्र मंडळाचे अध्यक्ष बंडूकाका बच्छाव व कलाकार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT