Reservoir constructed by Gram Panchayat.  esakal
नाशिक

Jal Jeevan Mission : टँकर मुक्तीसाठी वाद वराडी पॅटर्न ठरेल वरदान; जलजीवन योजनेतून उपक्रम राबविण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा

Jal Jeevan Mission : जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी गावात जलजीवन मिशन अंतर्गत वाद वराडी (ता. चांदवड) पॅटर्न राबविल्यास ही गावे कायमस्वरूपी टँकर मुक्त होऊन या गावांचा पाणी प्रश्न नक्कीच कायमचा सुटेल.

त्यामुळे या गावासाठी हा पॅटर्न वरदान ठरण्याची शक्यता आहे. यासाठी ग्रामस्थांनी एकजूट आणि इच्छाशक्ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (jal jeevan mission Controversy pattern will be boon for tanker liberation nashik news)

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये सध्या कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजनेचे कामे सुरू आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला ५५ लिटर पाणी देण्याचे शासनाचे धोरण आहे.

मात्र ही योजना मंजूर असलेल्या चांदवड तालुक्यातील अनेक गावे ही दुष्काळी आहेत. इथल्या विहिरींना फेब्रुवारी मार्च नंतर पाणीच नसते. म्हणूनच यातील काही गावांनी या योजनेचे काम थांबवले आहे.

चांदवड, नांदगाव, सिन्नर, इगतपुरी, देवळा, सटाणा, येवला आदी तालुक्यातील अनेक गावांत पावसाळ्यात कितीही पाऊस पडला तरीही फेब्रुवारी मार्च नंतर इथल्या विहिरींना पाणी राहत नाही. बहुतांश विहिरी कोरड्या ठाक पडतात. जर इथल्या अगोदरच विहिरींना पाणी उपलब्ध होत नाही मग जलजीवन अंतर्गत लाखो रुपये खर्च केले तरी उन्हाळ्यात या गावांतील जनतेला दररोज दरडोई पंचावन्न लिटर पाणी पुरवठा होईलच याची शाश्वती नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

असा आहे वाद वराडी पॅटर्न

चांदवड तालुक्यातील वाद वराडी गावाने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी होण्यासाठी होणारी वणवण आणि टंचाई यावर मात करण्यासाठी गावात दोन मोठे साठवण तलाव बांधले. या गावात मार्च ते जून असे चारच महिने तीव्र पाणीटंचाई जाणवते. जानेवारीपर्यंत विहिरींमधील पाणी हे साठवण तलावांमध्ये साठवले जाते. त्यानंतर टंचाईच्या काळात हे पाणी दोन्ही गावांना पुरविले जाते. तीन महिने हे पाणी नळाद्वारे गावांना पुरते.

आराखड्यात बदल करण्याची गरज

उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होत. चांदवड तालुक्यातील अनेक गावांमध्ये शाश्‍वत स्रोत नसताना देखील जलजीवन योजनेची कामे सुरु आहे. त्यामुळे वाद वराडी पॅटर्न राबवून या गावांची तहान भागविण्याची गरज आहे.

यासाठी जलजीवनच्या आराखड्यात या गोष्टीचा समावेश करणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येण्याची गरज आहे. जलजीवनमधून हा पॅटर्न राबविल्यास ही गावे टँकरमुक्त होण्यास हातभार लागणार आहे. यासाठी तीन हजार लोकसंख्या गृहीत धरुन तलाव बांधल्यास चार महिन्याचा पाण्याचा प्रश्‍न निकाली लागू शकतो.

वाद वराडी गावचा पाण्याचा ताळेबंद :

पॅटर्न दृष्टीक्षेपात

दोन्ही गावांची लोकसंख्या १ हजार ६१२

दैनंदिन पाण्याची गरज. ८८ हजार ६६० लिटर

टंचाई सदृश कालावधी एप्रिल ते जून

३ महिन्यासाठी पाण्याची गरज १ कोटी ५९ लाख ५८ हजार ८०० लिटर

साठवून उपलब्ध झालेले पाणी १ कोटी ६३ लाख ८० हजार लिटर

एकूण खर्च

खोदकाम ३ लाख ७५ हजार

कुंपण १ लाख ५० हजार

प्लास्टिक २ लाख ७५ हजार

पाणीपुरवठा जोडणी ५० हजार

एकूण खर्च... ८ लाख ५० हजार

"आमच्या ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून साठवण तलाव बांधला आहे. या साठवण तलावातील पाणी आमच्या दोन्ही गावांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत पुरले." - प्रवीण आहेर, सरपंच वाद वराडी ग्रुप ग्रामपंचायत

"जलजीवन मिशन अंतर्गत आमच्या गावाला कोट्यावधी रुपये मंजूर आहेत. मात्र या योजनेचा आराखडा गावकऱ्यांना विश्वासात न घेता बनवलेला आहे. या योजनेतून कितीही खोल आणि गावात कुठेही विहीर खोदली तरी मार्च नंतर पाणी राहणार नाही. त्याऐवजी योजनेतून पाच कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचा साठवण तलाव बांधून त्यावर जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करून पाणी पुरवठा करावा."-पंकज दखणे, माजी सरपंच निमो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT