jalgaon-manmad esakal
नाशिक

जळगाव-मनमाड तिसरा लोहमार्ग प्रकल्प अजूनही रेंगाळत

संजीव निकम

नांदगाव (जि.नाशिक) : गेल्या पंधरवड्यापूर्वी घेण्यात आलेल्या जळगाव ते भादली या तिसऱ्या रेल्वे मार्गाची चाचणी यशस्वी झाली. या मार्गावर ताशी १२० च्या वेगाने धावलेल्या गाडीमुळे दळणवळणासाठी हा मार्ग निर्धोक असल्याने त्याच्या या चाचणीची रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दखल घेत आपल्या ट्विटर हँडलवर संबंधितांच्या कामाचे कौतुकदेखील केले. जळगाव ते भुसावळदरम्यान तिसऱ्या लाइनच्या या कामासाठी लागलेला अवधी बघता आता उर्वरित जळगाव ते मनमाड या तिसऱ्या मार्गाच्या कामाच्या प्रगतिपुस्तकाचे काय, असा सवाल या चाचणीमुळे उभा राहिला आहे. (Jalgaon-Manmad-third-railway-project-still-stopped-nashik-marathi-news)

गाडीची यशस्वी चाचणी, तरीही अडथळा कायम

अकराशे कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण कारण्याबाबतची डेडलाइन आहे. भूसंपादन व त्यातील अडथळ्यांचा प्रवासच अद्यापही सुरूच आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशातील दळणवळणाच्या संबंधातील घेतलेल्या सर्व विभागीय रेल्वे, रेल्वे विकास निगम लि., आयआरकॉन इन टेरिनेशनल लि., मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड आणि अन्य प्रमुख कन्स्ट्रक्शन संघटनांच्या सर्वसाधारण उच्चस्तरीय आढावा बैठकीत रेल्वेच्या प्रकल्पातील होत असलेल्या कालहरणबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जळगाव ते भादली या तेरा किलोमीटरच्या अंतरात ताशी १२०च्या गतीने धावणाऱ्या गाडीच्या चाचणीमुळे उर्वरित प्रलंबित कामाला गती मिळावी, अशी पेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

भूसंपादनाच्या प्रक्रियेत खोडा

रेल्वे प्रशासनाचा हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून २०२४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र, माहेजी, परधाडे येथील काही शेतकऱ्यांना रेल्वेकडून योग्य मोबदला न मिळाल्याने जमिनी देण्यास त्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे भूसंपादनाच्या प्रक्रियेत खोडा उभा राहिला आहे. जळगाव ते मनमाडदरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनामुळे रखडले होते. गेल्या महिन्यांपासून या कामाने वेग घेतला आहे. रूळ टाकण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात शिरसोलीपर्यंत रूळ टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात भूसंपादनाचा तिढा सुटलेला नाही. तरसोद-असोदा येथील शेतकऱ्यांना प्रकल्पाचा जो मोबदला मिळाला, तोच मोबदला जळगाव-शिरसोलीच्या शेतकऱ्यांना हवा आहे. त्यानंतर दुसरा टप्पा हा शिरसोली-पाचोरा-गाळण असा एकूण ४६ किलोमीटरचा आहे. येथील भूसंपादनही अद्याप प्रलंबित आहे. अशीच अवस्था गाळण- नांदगाव- मनमाडदरम्यान आहे. काही ठिकाणी भूसंपादन मार्गी लागले. कोरोना काळामुळे रेल्वेची वाहतूक मर्यादित होती. या मोकळीकतेचा कुठलाही उपयोग हा प्रकल्प पुढे सरकण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून केला गेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT