Jayant Naikanware has been appointed as new Nashik Police Commissioner  
नाशिक

जयंत नाईकनवरे नाशिकचे नवे पोलिस आयुक्त

कुणाल संत

नाशिक : पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची मुंबईत बदली महिला सुरक्षा व प्रतिबंध विभागात बदली झाली. तर त्यांच्या जागी महत्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षा विभागाचे मुंबई येथील पोलिस उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांची नाशिक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गृह विभागातर्फे बुधवारी (ता.२०) राज्यातील १४ विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांना विशेष पोलीस महानिरीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली. त्यामध्ये महत्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षा विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांची नाशिक शहर पोलीस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. नाशिकचे मावळते पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची मुंबईमध्ये महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासह नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांना देखील विशेष पोलीस महानिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आलेली आहे. नाईकनवरे यांनी सातारा, वर्धा, पुणे, मुंबई जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे. त्याचप्रमाणे नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी पदोनन्नती दिली आहे.

मावळते पोलिस आयुक्त पांडे यांनी माजी पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांच्याबदलीनंतर नाशिकच्या आयुक्तपदाचा पदभार घेतला होता. कोरोना काळात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या स्वास्थाच्या काळजीसाठी विशेष उपक्रम राबविले. त्यानंतर शहरातील बेशिस्त वाहनचालक यांना शिस्त लावण्याच्या उद्देशाने हेल्मेटसक्ती, कोरोना काळात ‘नो हेल्मेट नो पेट्रोल, हेल्मेटशिवाय शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेशास निर्बंध असे विविध उपक्रम राबविले होते.

या उपक्रम सुरु असतानाच मार्च महिन्यात त्यांनी महसूल विभागातील अधिकारी हे आरडीएक्स आणि डिटोनेटर असल्याचे सांगत त्यांच्याकडील आधिकार कमी करत ते पोलीस आयुक्त यांना देण्यात यावे असा लेटर बॉम्ब टाकून संपूर्ण राज्याभर खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात महसूल अधिकारी यांच्याकडून याचा निषेध नोंदविण्यात येवून निर्देशने करण्यात आली होती. तसेच पोलीस आयुक्त यांनी महसूल विभागाची माफी मागावी आणि त्यांच्यावर रितसर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यादेखील पांडे यांच्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. श्री. पांडे यांनी महसूलमंत्री यांची माफी मागत मी माझ्यावर पत्रावर ठाम असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून त्यांच्याविरुद्ध महसूल अधिकाऱ्यांमध्ये रोष वाढला होता.

राजकीय पदाधिकाऱ्यांवर विनापरवानगी मोर्चे, आंदोलन, कार्यक्रम आयोजित केल्यास गुन्हे दाखल झाल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांमध्येही नाराजी होती. त्यामुळे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी मार्च महिन्यात शासनाकडे खासगी कारणास्तव विनंती बदलीसाठी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जानुसार त्यांची विनंती मान्य झाली

शहरात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र

काही दिवसांपुर्वीच नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी गंगाधरन डी यांची नियुक्ती झाली तर, सूरज मांढरे राज्याच्या शिक्षण आयुक्त पदी विराजमान झाले. म्हाडा घोटाळ्यात नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्याजागी रमेश पवार यांच्याकडे महापालिकेची धुरा सोपविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT