Jayant patil esakal
नाशिक

Jayant Patil News : नराधम गेला पण शिक्षणसंस्थेचे काय? शिवस्वराज्य यात्रेतून जयंत पाटील यांचा सरकारवर घणाघात

Latest Akshay Shinde Encounter News : बदलापूर घटनेबाबत संस्थाचालक असा काही प्रकार घडलाच नाही, असा बनाव करत होते आणि पीडितेचे नातेवाईक पोलिस ठाण्यामध्ये गेल्यानंतर तेथील पोलिस गुन्हा दाखल करून घेण्यास नकार देत होते. या सर्वांची चौकशी सरकार करणार का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बदलापूर घटनेतील संशयित आरोपीचा मृत्यू झाल्याचा खेद नाही; मात्र लहान मुलीवर अत्याचार घडलाच नाही, असा नकार देणाऱ्या संस्थाचालकांच्या चौकशीचे काय आणि संबंधित पोलिसांवर कारवाई होणार की नाही, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाशिकमध्ये केला. (Jayant Patil attacked government from Shivswarajya Yatra)

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा जिल्ह्यात दाखल झाली आहे. सोमवारी (ता. २३) शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात मेळावा घेण्यात आला. व्यासपीठावर खासदार डॉ. अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार, मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, जगदीश गोडसे उपस्थित होते.

मेळाव्यात जयंत पाटील यांनी भाजपवर सडकून टीका केली. नाशिकला दत्तक घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही प्रकल्प दिला नाही. याउलट नाशिकमधील एमडी कारखाने मुंबईच्या पोलिसांनी उद्‌ध्वस्त केले. नाशिकच्या पोलिसांना ही हिंमत दाखविता आली नाही.

बॉश कंपनीमधील कामगाराने सहकुटुंब आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे; परंतु नाशिकमध्ये आयटी पार्क उभारता न आल्यामुळे येथील युवक पुणे व बेंगळुरूला नोकरीसाठी जातात. नाशिककरांची फसवणूकच झाली आहे, असेही ते म्हणाले.

बदलापूर घटनेबाबत संस्थाचालक असा काही प्रकार घडलाच नाही, असा बनाव करत होते आणि पीडितेचे नातेवाईक पोलिस ठाण्यामध्ये गेल्यानंतर तेथील पोलिस गुन्हा दाखल करून घेण्यास नकार देत होते. या सर्वांची चौकशी सरकार करणार का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (latest marathi news)

डॉ. कोल्हे म्हणाले, की गेल्या लोकसभा निवडणुकीत हाताला काम हाच खरा राम हे नाशिक आणि अयोध्येतील जनतेने दाखवून दिले आहे. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन घडवा म्हणजे शरद पवार दिल्लीत परिवर्तन घडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गृहमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात २४० दिवसांमध्ये २१३ बलात्कार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

१५ लाख रुपये कबूल करून महिलांच्या हातावर पंधराशे रुपये टेकवणाऱ्या या सरकारला घरी बसवण्याची वेळ आल्याचे त्यांनी म्हटले. दोन महिने थांबा, नाशिकमधील राष्ट्रवादीचे कार्यालय आपल्या कार्यकर्त्यांना मिळेल, असा विश्वास मेहबूब शेख यांनी व्यक्त केला. गजानन शेलार यांनीही मनोगत व्यक्त केले.

आज भुजबळांच्या बालेकिल्ल्यात सभा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी (ता. २४) मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात जाणार आहे. तत्पूर्वी, सकाळी अकराला दिंडोरीला संस्कृती लॉन्समध्ये जाहीर सभा होईल.

दुपारी अडीचला चांदवडला सभा झाल्यानंतर मनमाडमार्गे येवल्यात सायंकाळी सातला माउली लॉन्समध्ये मेळावा घेण्यात येणार आहे. ही सभा आटोपल्यानंतर ते येवल्यात मुक्काम ठोकणार असल्याचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT