नाशिक : राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (जेईई) मेन्स परीक्षा घेतली जात आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या प्रवेशासाठी होत असलेल्या जेईई मेन्सच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षा ६ ते १२ एप्रिलदरम्यान देशभरात घेण्याचे नियोजित आहे.
या परीक्षेला प्रविष्ट होण्याकरिता विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज करण्याची मुदत १२ मार्चपर्यंत निश्चित केलेली आहे. (JEE Mains exam application deadline till March 12 nashik news)
विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या दोन परीक्षांतून सर्वोत्तम कामगिरीच्या आधारे राष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली जाणार आहे. त्यानुसार पहिल्या सत्रातील जेईई मेन्स परीक्षा ही गेल्या महिन्यात जानेवारीमध्ये पार पडली होती.
या परीक्षेचा निकालही यापूर्वी जाहीर करण्यात आलेला आहे. आता दुसऱ्या सत्रातील जेईई मेन्स परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्याचे नियोजित आहे. ही परीक्षा ६ ते १२ एप्रिल या कालावधीत घेतली जाणार असून १३ व १५ एप्रिल या तारखा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
यापूर्वी पहिल्या सत्राच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा आधीचा अर्ज क्रमांक (ॲप्लिकेशन नंबर) आणि पासवर्डचा वापर करून पेपर, व परीक्षेचे माध्यम, घरचा पत्ता, शहराचा तपशील निवडीची संधी असेल.
सोबत ऑनलाइन शुल्क भरायचे असेल. अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी पत्त्याचा पुरावा देणे बंधनकारक असणार आहे. एका विद्यार्थ्यास एकापेक्षा जास्त अर्ज करता येणार नाहीत. जर अशा प्रकारे दोन अर्ज केलेले विद्यार्थी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.