JEE Main Exam esakal
नाशिक

JEE Mains Exam: जेईई मेन्‍सच्‍या नोंदणीची 30 पर्यंत मुदत; जानेवारी आणि एप्रिलमध्ये राष्ट्रीय स्‍तरावर परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

JEE Mains Exam : जॉइंट एट्रान्‍स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स २०२४ या परीक्षेच्‍या नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नॅशनल टेस्‍टिंग एजन्‍सी (एनटीए) यांनी जारी केलेल्‍या वेळापत्रकानुसार ३० नोव्‍हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल.

जानेवारी आणि एप्रिल अशा दोन सत्रांमध्ये जेईई मेन्‍स परीक्षेचे आयोजन राष्ट्रीय स्‍तरावर केले जाणार आहे. दोन्‍ही प्रयत्‍नांना सामोरे जाण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्‍ध राहणार असून, यापैकी सर्वोत्तम कामगिरीचा विचार पुढील पात्रतेसाठी केला जाईल. (JEE Mains Registration Deadline 30 nov nashik news)

इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्‍स परीक्षा घेतली जात असते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता जेईई मेन्‍स परीक्षेचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. त्‍यानुसार पात्रताधारक विद्यार्थ्यांना नोंदणी करून व ऑनलाइन शुल्‍क अदा करून परीक्षेला प्रविष्ट होता येईल.

विद्यार्थ्यांना जेईई मेन्‍स परीक्षेसाठी दोन संधी उपलब्‍ध असणार आहेत. त्‍यानुसार ज्‍या विद्यार्थ्यांना दोन्‍ही प्रयत्‍न द्यावयाचे असतील, त्‍यांनी दोन परीक्षांसाठीचे शुल्‍क अदा करायचे आहे. ज्‍या विद्यार्थ्यांना केवळ एका सत्रातील परीक्षा द्यायची असेल, त्‍यांना केवळ तेवढ्या सत्रासाठीचे परीक्षा शुल्‍क अदा करावे लागेल.

जेईई मेन्‍स अंतर्गत पेपर क्रमांक एक हा बी.ई./बी.टेक. या शिक्षणक्रमांसाठी घेतला जातो. पेपर क्रमांक दोन हा बी.आर्क. आणि बी.डिझाईन या शिक्षणक्रमांसाठी घेतला जात असतो. या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली असून, विद्यार्थ्यांना ३० नोव्‍हेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे.

परीक्षा केंद्राबाबत शहराची घोषणा जानेवारीत

ऑनलाइन परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रासाठी शहरांचे पर्याय नोंदवायचे आहेत. उपलब्‍धतेनुसार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निश्‍चित केले जातील. परीक्षा केंद्राबाबत शहराची घोषणा जानेवारीच्‍या दुसऱ्या आठवड्यात केली जाणार आहे; तर परीक्षेचे आयोजन २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी या दरम्‍यान केले जाईल.

नव्वद गुणांसाठी पेपर, तीन तासांचा वेळ

बी.ई./बी.टेक. शिक्षणक्रमासाठीची परीक्षा नव्वद गुणांसाठी असेल. यात गणित, भौतिकशास्‍त्र आणि रसायनशास्‍त्र या विषयांचे प्रत्‍येकी ३० गुणांसाठी प्रश्‍न विचारले जातील. ही परीक्षा संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) असून, वस्‍तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन तासांचा कालावधी दिला जाणार आहे. सकाळ सत्रात नऊ ते बारा आणि दुपार सत्रात तीन ते सहा या वेळेत परीक्षा घेतली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT