अस्वली स्टेशन/इगतपुरी शहर (जि. नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव (ता. इगतपुरी) शिवारातील जिंदाल कंपनीतील अग्नितांडवमध्ये बेपत्ता असलेल्या सुधीर मिश्रा (वय ३७, मूळ रा. अहलाबाद-उत्तरप्रदेश) कामगाराचा मृतदेह ढिगाऱ्याखाली आढळून आला.
आणखी जवळपास ८३ कामगार बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र कंपनीच्या व्यवस्थापनातर्फे त्याबद्दलची अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. (Jindal fire Accident Body of missing worker found under debris Doubts about missing workers persist nashik news)
ढिगाऱ्याखाली मृतदेह कामगार बेपत्ता असल्याचे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते. १ जानेवारीच्या अग्नितांडवावेळी कंपनीत उपस्थित असलेल्या कामगारांच्या उपस्थितीवरून कंपनीत उपस्थित, जखमी, मृत, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कामगारांच्या संख्या याचा ताळमेळ खात नसल्याचे दिसून येते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे कामगारांच्या संख्येबाबत आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. दरम्यान, खासदार हेमंत गोडसे यांनी आज कंपनीत पाहणी केली. अग्नितांडव विषयी माहिती देण्यास परप्रांतीय कामगार धजावत नाहीत. आपला रोजगार जाईल या भीतीपोटी परप्रांतीय कामगारांनी मौन पाळले आहे.
कंपनीतील आगीवर चार दिवसानंतर नियंत्रण मिळवण्यात यंत्रणांना यश आले आहे. कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला नसून रासायनिक गॅस गळतीमुळे आग लागल्याची माहिती श्री. गोडसे यांना अधिकाऱ्यांनी दिल्याची सांगण्यात आले. आगीत आठ मजली इमारत जळून खाक झाल्याचे चित्र पाहावयास मिळते.
हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
जळालेल्या इमारतीत प्रवेश झाला नसल्याने इथे कुणी अडकले आहे की नाही? हे स्पष्ट झालेले नाही. पोलिस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घोटीचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर हे पोलिस पथकासह कंपनीत पंचनामा करत आहेत. पंचनाम्यात कंपनीत असलेल्या कामगारांची चौकशी सुरू असून बेपत्ता कामगारांचा शोध घेतला जात आहे.
" चार दिवसांपासून कंपनीतील बेपत्ता असलेल्या कामगाराचा मृतदेह आज आढळून आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून अग्निशमन दलाच्या २० बंब आणि जवानांनी आग आटोक्यात आणली. आता ३ बंब आणि जवान आग पूर्णतः आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करताहेत. स्फोट होऊन अग्नितांडव सुरु झाले असताना दोनशेहून अधिक कामगार उपस्थित होते. दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करून सखोल चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे."
- देविदास आडोळे, सीआयटीयू कामगार संघटना
"कंपनी व्यवस्थापनाकडून प्रशासनाला दिल्या जाणाऱ्या माहितीची सत्यता पडताळून पाहावयास हवी. कंपनीतील अग्नितांडवची भीषणता लक्षात घेता कामगारांची चिंता वाढली आहे. कंपनीत जवळपास सात हजार काम करतात. कंपनी व्यवस्थापनाने बाराशे कामगारांची संख्या दिली. सकाळच्या शिफ्ट मध्ये दीडशे ते दोनशे कामगार काम करत असतील, तर १९ कामगारांचा हिशेब कसा लावला हा खरा प्रश्न आहे. " - कुलदीप चौधरी, शिवसेना उपतालुकाप्रमुख
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.