Jindal Fire Accident esakal
नाशिक

Jindal Fire Accident : चौकशी अहवाल येईपर्यंत जिंदाल पॉलीफिल्म कंपनीचे उत्पादन बंदचे आदेश!

सतीश निकुंभ

सातपूर (नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावरील जिंदाल पॉलीफिल्म कंपनीतील अग्नितांडवमध्ये कामगारांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या आरोग्यासह सुरक्षा लक्षात घेऊन कंपनीला उत्पादन बंदचा आदेश सरकारतर्फे देण्यात आला आहे.

जिल्हा औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय (डिश) व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीची अट उत्पादन सुरू करण्यासाठी टाकण्यात आली आहे. (Jindal Fire Accident Production of Jindal Polyfilm Company ordered to stop till inquiry report nashik news)

औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बाष्पके, कामगार आयुक्तालयासह तपास यंत्रणांचा अहवाल येईपर्यंत उत्पादनासाठी परवानगी कशी मिळणार, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

कंपनीतील रिॲक्टरच्या स्फोटाने लागलेल्या आगीच्या शेजारी मोठ्या प्रमाणात कच्चा आणि तयार माल होता. आगीसह उठलेल्या रासायनिक उग्र दुर्गंधीच्या धुराच्या लोळामुळे पर्यावरणाची हानी झाल्याचा प्राथमिक अहवाल सरकारला सादर झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

औद्योगिक सुरक्षेच्या अनुषंगाने यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी त्यास दुजोरा दिला आहे. दरम्यान, औद्योगिक सुरक्षेसह कामगार व उच्च चिमण्यांच्या परीक्षणमधील गोंधळाची स्थिती अग्नितांडवला जबाबदार ठरली आहे काय? असा संशय यंत्रणांमधील अधिकाऱ्यांना आहे.

एवढेच नव्हे, तर कंपनीत प्रवेश करण्यास अधिकाऱ्यांना परवानगी मिळत नसल्याने यंत्रणांची नाराजी कंपनीच्या व्यवस्थापनाने ओढावून घेतल्याचे अधिकाऱ्यांच्या बोलण्यातून डोकावत होते. एवढेच नव्हे, तर बाहेरून कामगार ट्रकमधून कंपनीत आणण्यात आल्याची माहिती मिळाल्याने तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

ही सारी परिस्थिती अधिकाऱ्यांनी थेट मंत्रालयापर्यंत पोचवली आहे. त्यामुळे मंत्रालयातील उच्चपदस्थांकडून कारवाईचा दबाव वाढत चालला आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून कंपनीला पहिली नोटीस सरकारने जारी केल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

अग्नितांडव आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल, एन. डी. आर. एफ., एस. डी. आर. एफ. सह सुरक्षा विभागाचे जवान प्रयत्न करत होते. अशा परिस्थितीत कंपनीचे कामकाज बंद ठेवणे गरजेचे असताना दुसरीकडे कंपनी व्यवस्थापनाकडून बाहेरून कामगार आत आणण्याचे कारण काय, असा प्रश्‍न अधिकाऱ्यांना पडला आहे. त्याबद्दल कंपनीच्या व्यवस्थापनाला अधिकाऱ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे.

कामगारांची घेणार माहिती

कंपनीत परप्रांतीय कामगारांच्या नावाखाली नेमके कोठून कामगार आणले आहेत, यासंबंधीची माहिती तपास यंत्रणांच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. तशा सूचना तपास यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली. गेल्या तीन दिवसांपासून कामगार उपायुक्त विकास माळी यांच्या उपस्थितीत दुर्घटनेची माहिती घेतली जात आहे.

कंपनीतर्फे अनेक ठेकेदारांची माहिती दिली जात नसल्याचा मुद्दा त्यात उपस्थित झाला आहे. आतापर्यंत नऊ ठेकेदारांची माहिती दिली गेली असून, त्यातील बऱ्याच जणांकडे परवान्यापेक्षा अधिक कामगार आढळून आल्याची माहिती मिळत आहे. त्याअनुषंगाने सरकारला प्रस्ताव सादर होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT