The fire, far from the scene, was still burning on Wednesday evening. & Forensic Lab Officer during Panchnama. esakal
नाशिक

Jindal Fire Accident : फॉरेन्सिक लॅबकडून संशयास्पद नमुने जमा

सकाळ वृत्तसेवा

घोटी(जि. नाशिक) : जिंदाल पॉलिफिल्म कंपनीला लागलेली आग चांगल्यापैकी आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवल्याने फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी इमारतीमधून खालील मजल्यामधील संशयास्पद नमुने जमा करता आले आहे. वेस्टेज पॉलिथिन कचरा बुधवारी (ता. ४) ही दिवसभर धुमसताना दिसत होता. (Jindal Fire Accident Suspicious samples submitted by forensic lab nashik news)

कंपनीकडून कामगार यादीनुसार तीन कामगार बेपत्ता असल्याचे सांगितले होते. यामुळे तीनही कामगार मृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीदेखील पोलिस प्रशासन घटनास्थळी चार दिवसांपासून कामगारांना खोदून-खोदून माहिती घेण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. रासायनिक धुराचा अनेक तपास अधिकाऱ्यांना शारीरिक त्रास होत असतानादेखील माहिती संकलनाचे काम युद्धपातळीवर रात्री उशिरापर्यंत सुरूच होते.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रासायनिक दुर्गंध असल्याने फॉरेन्सिक लॅब अधिकारी व पोलिस प्रशासनास तपासात अडथळे येत आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी इमारतीचे बांधकाम तपासले असता वरील मजल्यावरील आग तपासणी करण्यासाठी लगेच योग्य वेळ नसल्याचे सांगितले. यामुळे खालील मजल्याच्या आवारातील नमुने फॉरेन्सिक लॅब अधिकाऱ्यांना जमा करता आले.

प्रयोगशाळेत नमुने तपासणी करून माहिती दिली जाईल. यावर पुढील निष्कर्ष काढणे शक्य होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कंपनीमधील वीजपुरवठा खंडित असल्याने मोबाईल टॉर्चरवर कामकाज सुरू होते.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

चौथ्या दिवशीही पोलिस बंदोबस्त कंपनीत कायम ठेवण्यात आला असून कामगारांनी कोणाच्याही दबावाखाली बळी न पडता पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे पोलिस उपअधीक्षक डॉ. अर्जुन भोसले यांनी कामगारांना आवाहन केले. महसूल विभागाचे अधिकारीदेखील घटनास्थळी उपस्थित असून प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

स्थानिक पोलिसांना आदेश

माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ८३ कामगार आत असल्याचे म्हटले होते, मात्र याबाबत त्यांच्याकडे खात्रीलायक माहिती देणारी कामगार यादी, तक्रारदाराबाबत सायंकाळपर्यंत कोणत्याही प्रकारचा ठोस पुरावा न दिल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना त्यांच्याकडून तातडीने माहिती घेण्याचे आदेश दिले आहे. मेंगाळ यांनी संशय व्यक्त केल्यानुसार पोलिस पुन्हा-पुन्हा माहिती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न कामगारांना विचारात माहिती घेत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT