Nashik Jio Cinema Live : प्रत्येक इंटरनेट वापरकर्त्यापर्यंत क्रिकेटचा थरार (Nashik News) पोचविण्याच्या उद्देशाने जिओ-सिनेमा ‘टाटा आयपीएल फॅन पार्क्स’ येथे सामने डिजिटल पद्धतीने थेट स्ट्रीमिंग करेल. १३ राज्यांतील ३५ हून अधिक शहरांतील खुल्या मैदानांवर सामने दाखविले जातील. जिओ सिनेमा चालू हंगामातील अधिकृत डिजिटल प्रसारक आहे. (Jio Cinemas will stream ipl matches digitally live at Tata IPL Fan Parks nashik news)
‘टाटा आयपीएल फॅन पार्क’मध्ये प्रवेश विनामूल्य असेल. महाकाय एलईडी स्क्रीनवर जिओ सिनेमा अॅपद्वारे क्रिकेटप्रेमी लाइव्ह सामन्यांचा आनंद घेऊ शकतील. प्रेक्षकांना मोकळ्या मैदानात क्रिकेटचा आनंद घेता यावा, यासाठी फॅमिली झोन, किड्स झोन, फूड ॲन्ड बेव्हरेजेस आणि जिओ-सिनेमा एक्सपिरियन्स झोनही तयार केला जाईल.
जिओ-सिनेमाने १६ एप्रिलचे वेळापत्रक जाहीर केले आहे. नाशिक, अजमेर आणि कोचीच्या चाहत्यांना फॅन पार्कमध्ये १६ एप्रिलला होणारे दोन्ही सामने पाहता येणार आहेत. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. टाटा आयपीएल फॅन पार्कचे दरवाजे दुपारी दीडपासून उघडतील.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
Viacom१८ चे प्रवक्ते म्हणाले, ‘चाहते आणि प्रेक्षक त्यांच्या सोयीनुसार जागतिक दर्जाचा खेळ पाहू शकत असले तरी ते देशभरात पोचावेत, अशी आमची इच्छा आहे. सुरवातीच्या सामन्यांमधला सिनेमा म्हणजे प्रेक्षक डिजिटलला पसंती देत आहेत, याची साक्ष आहे’
जिओ-सिनेमावर टाटा आयपीएलने अनेक विक्रम मोडले आहेत. टाटा आयपीएलच्या पहिल्या वीकेंडला जिओ-सिनेमावर विक्रमी १४७ कोटी क्रिकेट व्हिडिओ व्ह्यूज पाहण्यात आले. संपूर्ण गेल्या सीझनमध्ये पाहिलेल्या एकूण व्हिडिओंच्या संख्येपेक्षा हे जास्त आहे. २०२२ च्या आयसीसी टी-२० विश्वकरंडकातही एवढ्या मोठ्या संख्येने व्हिडिओ पाहण्यात आले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.