Christmas preparations underway at St. Anna's Cathedral here esakal
नाशिक

Christmas 2023: येशू जन्माचा जल्लोष! चर्चवर आकर्षक रोषणाई अन् सजावट, थीम केकसह भेटवस्तूंना मागणी

सेंट आंद्रिया चर्चमध्ये रविवारी सकाळी नऊला सामुदायिक भक्तीनंतर बाप्तिस्मा विधी झाले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाताळच्या पार्श्वभूमीवर ख्रिश्चन बांधवांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील सेंट आंद्रिया, होली क्रॉस चर्च, संत थॉमस चर्च, नाशिक रोड, देवळाली कॅम्प येथील चर्चवर रंगरंगोटीसह आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

रविवारी (ता. २४) सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवारी (ता. २४) रात्री मिस्सा (प्रार्थना) पठण करून भाविकांनी येशू जन्मोत्सवाचा जल्लोष केला. (Joy of birth of Jesus Attractive lighting and decorations on church demand for gifts including theme cakes Christmas 2023 Nashik)

सेंट आंद्रिया चर्चमध्ये रविवारी सकाळी नऊला सामुदायिक भक्तीनंतर बाप्तिस्मा विधी झाले. रात्री नऊ ते दहादरम्यान नाताळ पूर्वसंध्या भक्तीचे आयोजन चर्चमध्ये करण्यात आले होते.

सोमवारी (ता. २५) सकाळी सहाला सनराईज नाताळ भक्ती, सकाळी नऊला नाताळ विशेष उपासना व प्रभू भोजन, तर सायंकाळी सहाला केक वाटप व धार्मिक गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

२६ डिसेंबरला ‘संडे स्कूल’च्या धार्मिक कार्यक्रमाचे, तसेच तरुण संघाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २७ डिसेंबरला विभागवार कार्यक्रम आहेत.

यासह ३० डिसेंबरला फॅन्सी ड्रेस स्पर्धा व १ जानेवारीला येशू नामकरण सोहळा व नववर्ष भक्तीसंध्या कार्यक्रमाचे आयोजन असल्याची माहिती सेंट आंद्रिया चर्च इंग्रजीचे रेव्हरंट अनंत आपटे यांनी दिली.

होली क्रॉस चर्चमध्ये रविवारी (ता. २४) रात्री ९ ते ९.३० नाताळ निमित्ताने होली क्रॉस युथ क्लबतर्फे नाटिका सादरीकरण झाले. तसेच ९.३० ते ११ येशू जन्माची प्रार्थनासभा (मिस्सा) पार पडली. भाविकांनी सहकुटुंब प्रभू येशू जन्माचा जल्लोष केला.

सोमवारी (ता. २५) पहाटे ५.३० ते ६.३० सत्य साई संघटनेतर्फे नाताळ प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी ५.३० ते ७.३० भारतीय एकात्मता समिती व होली क्रॉस चर्च संयुक्त विद्यमाने नाताळनिमित्त बंधूप्रीती स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे.

पर्यावरण पूरक सजावटीला प्राधान्य

नाताळनिमित्त चर्चमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. याचबरोबर ख्रिश्चन बांधव घरोघरी येशू जन्माचे देखावा साकारले आहेत. गव्हाणी साकारताना ख्रिश्चन बांधवांनी पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य दिले आहे.

मेरी ख्रिसमस म्हणत गिफ्ट देणारा सांताक्लॉज लहानग्यांना अत्यंत आवडता. या सांताक्लॉजचे कपडे, टोप्या, आकाशात उडणारे फुगे शहरातील चौकाचौकात, तसेच दुकानांत विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. पालक लहानग्यांना गिफ्ट देणाऱ्या लाडक्या सांताक्लॉजची वेशभूषा करण्यासाठी खरेदी करत आहेत.

‘ख्रिसमस ट्री’ अन् प्लम केकला मागणी

ख्रिश्चन बांधवांचा नाताळ सण प्रभू येशूचा जन्मोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा झाला. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी केकला सर्वाधिक मागणी बाढली. खिश्चन बांधवांची खास नाताळनिमित्त वर्षातून एकदाच तयार केल्या जाणाऱ्या प्लम केकला पसंती मिळत आहे.

खास नाताळसाठी मागणीनुसार विशिष्ट प्रकारचे केक तयार केले आहेत. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताला थीम केकला सर्वाधिक मागणी आहे. भेट देण्यासाठी चॉकलेट, मफिन्स यांची एकत्रित सजवलेली टोपली उपलब्ध आहे, अशी माहिती बेकर्स क्राफ्टच्या संचालिका कविता आहेर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT