Market Committee Election esakal
नाशिक

Election News : जे.पी.गावित यांचा परिवर्तनला बिनशर्त पाठिंबा; कळवणला 18 जागांसाठी 40 उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा

Election News : बाजार समितीच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी ९० उमेदवारांनी माघारी नोंदवली. त्यामुळे १८ जागांसाठी ४० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे.

यावेळी माजी आमदार जे.पी.गावित यांच्या शेतकरी विकास आघाडी पॅनलने अखेरच्या दिवशी सर्व उमेदवाराच्या माघारी नोंदवून परिवर्तन पॅनलला बिनशर्त पाठिंबा दर्शविला.

त्यामुळे कळवण बाजार समितीत सत्तेसाठी सत्ताधारी शेतकरी विकास पॅनल आणि परिवर्तन पॅनलमध्ये सामना रंगणार आहे. (JP Gavit unconditional support for transformation 40 candidates Election for 18 seats market committee nashik news)

आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी सभापती धनंजय पवार यांचे सत्ताधारी गटाचे शेतकरी विकास पॅनल तर माजी आमदार जे.पी.गावित यांचा बिनशर्त पाठिंबा असलेले मविप्र संचालक रवींद्र देवरे यांचे परिवर्तन पॅनल यांच्यात समोरासमोर लढत होत आहे.

मागील दोन ते तीन दिवसापासून तालुक्यात ठिकठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक गटांच्या ठिकठिकाणी मॅरेथॉन बैठका होऊन विचारविनिमय व चर्चा सुरु होती. नेत्यांचे मनोमिलनपासून जागा वाटपावर बैठकावर बैठका होत असल्यामुळे ३ पॅनल होणार अशीच चर्चा होती.

मात्र माघारीच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्यामुळे या निवडणुकीतून तिसऱ्या पॅनलच्या उमेदवारांनी माघारी नोंदवली. सत्ताधारी शेतकरी विकास पॅनल विरोधात सर्व विरोधकांनी एकमताने परिवर्तन पॅनलची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्यामुळे माकप नेत्यांनी परिवर्तनला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.

माजी सभापती धनंजय पवार यांनी बैठकीत काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे यांनी शेतकरी विकास पॅनलच्या १५ उमेदवारांची घोषणा केली. यावेळी नगराध्यक्ष कौतिक पगार, अँड. संजय पवार, यशवंत गवळी, मधुकर जाधव, युवराज गांगुर्डे, राजेंद्र भामरे, प्रभाकर पाटील, कडू पाटील, विठोबा बोरसे, नामदेव खैरनार, परशुराम शिंदे, हौशीराम दळवी, रमेश पवार उपस्थित होते.

माजी आमदार जे.पी.गावित व मविप्र संचालक रवींद्र देवरे यांनी परिवर्तन पॅनलच्या १५ उमेदवारांची घोषणा केली. यावेळी मोहन जाधव, अंबादास जाधव, केदा सोनवणे, शरद पगार, जितेंद्र पगार, प्रकाश पवार, संदीप वाघ,सुनील देवरे, जयंत पवार,बाळासाहेब गांगुर्डे, पोपट पवार, उपस्थित होते

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

शेतकरी विकास पॅनल :

सोसायटी गट : बाळासाहेब गांगुर्डे, सुधाकर खैरनार, सोमनाथ पवार, पंढरीनाथ बागूल, दत्तू गायकवाड, प्रवीण देशमुख, दिलीप कुवर,

महिला राखीव : सुनीता जाधव, रेखा गायकवाड

इतर मागासवर्गीय : धनंजय पवार

भटक्या विमुक्त जमाती : बाळासाहेब वराडे,

ग्रामपंचायत गट : ॲड. मनोज शिंदे, किसन बागूल, यशवंत गवळी (अनुसूचित जाती,जमाती) संभाजी पवार (आर्थिक दुर्बल).

परिवर्तन पॅनल :

सोसायटी गट : योगेश पगार, बाबुराव पगार, पुंडलिक गवळी, योगेश गायकवाड, कारभारी पवार, नंदू गांगुर्डे, मधुकर भदाणे, रवींद्र देवरे (इतर मागासवर्गीय),

महिला राखीव : सुमनबाई देशमुख, अनिता पाटील

भटक्या विमुक्त : राहुल सातव

ग्रामपंचायत गट : भरत पाटील, ज्ञानदेव पवार, राम चौरे (अनुसूचित जाती,जमाती), शीतलकुमार अहिरे (आर्थिक दुर्बल)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT