नरकोळ : अंबटगोड चवीची लालचुटूक गुलाबी स्ट्रॉबेरी बाजारात दाखल झाली आहे. यंदा पोषक हवामानामुळे स्ट्रॉबेरीचे उत्पन्न चांगले झाले असल्याने स्ट्रॉबेरीचे पीक घेणाऱ्यांना चांगला भाव मिळत आहे.
गेल्या आठवड्यापासून शहरातील बस स्थानक सह चौकाचौकात फ्रूट मार्केटमध्ये स्ट्रॉबेरीची दुकाने आकर्षक होत आहे.
जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, कळवण या आदिवासी भागात काही गावांमध्ये आजही स्ट्रॉबेरीचे चांगले पीक आल्याने त्यांना थेट बाजारात चांगला भाव देखील मिळू लागला आहे.(Juicy pink strawberries attract attention in tribal areas Nashik News)
किरकोळ बाजारातही स्ट्रॉबेरी विक्रीसाठी उपलब्ध झाली असून ग्राहकांकडून मागणी होताना दिसत आहे. गेल्या वर्षांपेक्षा यावर्षी दहा ते वीस रुपये भाव अधिक मिळत आहे. सध्या नांदुरी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी स्ट्रॉबेरीचे छोटे मोठे स्टॉल उभारण्यात आले आहेत.
आदिवासी भागात वाढतेय महत्व
माथेरान, पाचगणी येथे उत्पादित होणारी स्ट्रॉबेरी आता कळवण तालुक्यातील खिराड, बोरगाव, सुकापुर हे गावे स्ट्रॉबेरीचे केंद्रबिंदू ठरत आहे. येथून घाऊक व्यापारी व किरकोळ विक्रेते स्ट्रॉबेरी खरेदी करून शहरात विक्रीसाठी येतात.
हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...
स्ट्रॉबेरीच्या जाती
विंटरडाऊन, नाभीला, कामरोझा, आर वन, एस वन
असे आहेत स्ट्रॉबेरीचे दर (प्रतिकिलो)
गतवर्षी - ९० ते १०० रुपये
यावर्षी - ११० ते १३० रुपये
"थंडीचा जोर वाढल्याने स्ट्रॉबेरीचे उत्पादन वाढले असून मी नांदुरी गडावर रस्त्याच्या कडेला शेतातच स्ट्रॉबेरी पिक घेतले असून ताजी आणि रसरशीत स्ट्रॉबेरी विक्रीस ठेवतो त्यामुळे ग्राहक खरेदीसाठी गर्दी करतात."
- विनोद चव्हाण, उत्पादक, मोहनदरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.