Jal Jeevan Mission esakal
नाशिक

Jal Jeevan Mission: जिल्ह्यात 600 योजना पूर्ण करण्यासाठी 30 जून डेडलाईन; जलजीवन मिशन योजना आढावा बैठकीत सूचना

सकाळ वृत्तसेवा

Jal Jeevan Mission : जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत असलेल्या योजनांची कामे कासवगतीने सुरू असल्याने जिल्हा परिषदेने आता ही कामे वेळात पूर्ण करण्यासाठी पावले उचललेली आहे.

याच अनुषंगाने १२२२ योजनांपैकी ६०० हून अधिक एक कोटींच्या आत असलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेने ठेकेदारांना ३० जून २०२३ ची डेडलाईन दिली आहे.

जून अखेर योजना पूर्ण न केल्यास कारवाईचा इशारा जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी दिला आहे. (June 30 deadline to complete 600 schemes in district Notice in Jal Jeevan Mission Scheme Review Meeting nashik news)

केंद्र सरकारची महत्वकांक्षी असलेल्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत योजना २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्टही निश्चित केले आहे. जिल्ह्यातील १२९६ गावांसाठी १२२२ जलजीवन योजना मंजूर आहेत.

यात ६८१ योजना रेट्रोफिटींग तर, ५४१ योजना नवीन आहेत. १२२२ योजनांपैकी १ हजार १५ कामे प्रगतीत आहे. तर, ५९ योजना फक्त पूर्ण झाल्या असून ५१ योजना अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. या योजनांना वन विभाग, जलसंधारण सह गावतंर्गत वादाचा अडथळा येत होता.

या पार्श्वभूमीवर जलजीवन मिशनची कामे वेळात व्हावी, यासाठी ठेकेदार, शाखा अभियंता, उपअभियंता, गावातील संरपंच, ग्रामसेवक यांची एकत्रित बैठक मंगळवारी (ता.२५) झाली. बैठकीस अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, कार्यकारी अभियंता सोनवणे उपस्थित होते.

जलजीवन मिशन योजनेतंर्गत कामांना वन, जलसंधारण विभागामुळे अडचणी निर्माण झालेल्या योजनांसाठी त्या-त्या विभागाकडे स्थानिकांच्या मदतीने जिल्हा परिषद स्तरावरून पाठपुरावा करण्याचा निर्णय झाला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

गाव अंतर्गत अडचणी दूर करून रखडलेल्या योजना तत्काळ सुरू करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी दिले. कार्यारंभ आदेश देताना असलेल्या काही योजनांचा खर्च वाढला आहे. या वाढीव खर्चास राज्य शासनाची मान्यता घ्यावी लागणार आहे.

त्यासाठी वाढीव खर्चासह असलेला सुधारित प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचनाही सोनवणे यांनी यावेळी दिल्या. कामे वेळात सुरू करण्याचे निर्देश असताना देखील, काही योजना अद्यापही सुरू झालेल्या नाहीत, ही गंभीर बाब असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

त्यासाठी एक कोटींच्या आतील असलेल्या योजनांची कामे वेळात पूर्ण होण्याकरिता ३० जूनची डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. ३० जून अखेर या योजना पूर्ण कराव्यात, असे आदेश यावेळी सोनवणे यांनी दिलेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT