नाशिक : राज्यातील सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतरांच्या १४ मार्चपासून होणाऱ्या बेमुदत संपात सहभागी होण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन (Junior College) शिक्षक महासंघाने घेतला आहे. (Junior College Teachers Participation in Indefinite Strike nashik news)
त्यासंबंधीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले. महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे यांनी ही माहिती दिली. प्रा. शिंदे म्हणाले, की महाराष्ट्र राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने १ नोव्हेंबर २००५ ला राज्यातील अर्धवेळ,
अंशतः, अनुदानित, विनाअनुदानित सेवेत असणाऱ्या आणि १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी व इतर मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
महासंघ समितीचा एक भाग असल्याने बेमुदत संपात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या समस्या दीर्घकाळ प्रलंबित असून, त्याबाबत राज्य सरकार तातडीने अनुकूल निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मंजूर कराव्यात आणि बेमुदत संप करावा लागू नये, अशी अपेक्षा असल्याचेही पत्रात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.