Circulation of water leaving the Kadwa Canal. esakal
नाशिक

Nashik News: कडवा कालव्यास आवर्तन सुटले; आमदार कोकाटे यांची आक्रमक भूमिका

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तालुक्यातील शेतकऱ्यांवर पाण्याच्या आवर्तनाबाबत अन्याय होणार असेल, तर मी गप्प बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका आमदार माणिकराव कोकाटे यांनी घेतल्याने अखेर जलसंपदा विभागाने कडवा कालव्यास आवर्तन सोडले.

बुधवारी (ता. ९) दुपारी दोनला १५० क्यूसेकने कालव्यास आवर्तन सोडण्यात आले. (Kadwa canal avartan Aggressive role of MLA Kokate Nashik News)

तालुक्याच्या पूर्व भागात दोन महिन्यानंतरही पाऊस न पडल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या उदभवू लागली आहे. पशुपालकांना जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे.

कडवा कालव्यास आवर्तन सोडण्याची मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे पूर्व भागातील शेतकऱ्यांनी केली. त्यासंदर्भात अधिकाऱ्यांसमवेत आमदार कोकाटे यांनी मंगळवारी (ता. ८) बैठक घेतली.

जलसंपदा विभागाचे उत्तर महाराष्ट्र मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांच्या दालनात बैठक झाली. लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नाशिकचे मुख्य अभियंता महेंद्रकुमार आमले, अहमदनगरचे अधीक्षक अभियंता शेट्ये, कार्यकारी अभियंता सोनल सहाणे, कार्यकारी अभियंता संगीता जगताप, कडवाचे उपविभागीय अभियंता मिलिंद बागूल, गोदावरी कालवा नूतनीकरणचे उपविभागीय अभियंता टोपले आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जायकवाडीचे कारण सांगत कडवा कालव्यास आवर्तन सोडता येत नसल्याचे सांगितले. यावर आमदार कोकाटे यांनी आक्रमक भूमिका घेत सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल, तर मी गप्प बसणार नाही.

अखेर अधिकाऱ्यांना रब्बीचे आवर्तन कमी करून आवर्तन सोडावे लागेल, असे सांगितले. आज पाणी नसेल, तर रब्बीत मिळून त्याचा काय उपयोग, असा प्रश्न आमदार कोकाटे यांनी उपस्थित केला.

रब्बीचे रब्बीत पाहू, सध्या शेतकरी व पशुधन जगवा, अशी आग्रही भूमिका आमदार कोकाटे यांनी घेतल्याने अखेर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कालव्यास आवर्तन सोडण्याचा शब्द आमदार कोकाटे यांना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT