Kal Bhairavnath jayanti celebration at Saptashrungi gad nashik news esakal
नाशिक

Kalbhairav ​​Nath Jayanti: सप्तशृंगी गडावर कालभैरवनाथांच्या जयघोषात जयंती उत्सव संपन्न..

दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेवा

Kalbhairav ​​Nath Jayanti:

देवराजसेव्यमानपावनांघ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् । नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥

ज्यांच्या पवित्र चरण कमलांची देवराज इंद्र नेहमी पूजा करतात, ज्यांनी शिरोभूषण म्हणून चंद्राला धारण केले आहे, सर्प ज्यांनी यज्ञोपवित्र म्हणून धारण केला आहे, जे दिगंबर आहेत व नारद आणि इतर योगिजन ज्यांची पूजा करतात अशा काशी नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो. (Kal Bhairavnath jayanti celebration at Saptashrungi gad nashik news)

आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर शक्तीपीठाचा रक्षक असलेल्या श्री कालभैरवनाथांचा जयघोष व पुरोहितांचा कालभैरवाष्टकांचा मंत्रोच्चारात कालभैरवनाथ जयंती उत्सव विविध धार्मिक विधींनी उत्साहात संपन्न झाला.

श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर आदिमाया सप्तशृंगी मंदिराचे दर्शन घेवून परतीच्या मार्गावर मंदिराच्या खालच्या मजल्यावर कालभैरवनाथ टप्यावर श्री कालभैरवनाथांचे स्वतंत्र मंदिर आहे. श्री कालभैरव हे महादेवांचेच रुद्रावतार असुन हे मुख्य क्षेत्रपाल दैवत आहे. आठ दिशांना मुख्य मुख्य आठ, आठ क्षेत्र रक्षक भैरव देवता असुन या 64 भैरवांचे मुख्य अधिनायक दैवत म्हणजेच श्रीकालभैरवनाथ हे होय.

गावाचे व भाविकांचे सरंक्षण करणारे हे मुख्य कोतवाल दैवत असल्याने आदिमायेचे दर्शन घेतल्यानंतर श्री कालभैरवनाथांचे दर्शन घेवूनच भाविक गड उतरतात. मंगळवार (ता. ५) रोजी कालाष्टमी व श्री कालभैरवनाथ जयंती निमित्त श्री कालभैरवनाथ मंदीरास आकर्षक फुलमाळांची आरास करण्यात आली होती.

दरम्यान सकाळी कालभैरवनाथांचे पुजारी मिलींद दीक्षित यांनी शुद्धजलधारांचा रुद्रभिषेक महापूजा केली. तसेच सकाळी दहा वाजता पुरोहितांच्या मंत्रघोषात कालभैरव यागास प्रारंभ करण्यात आला.

यागाचे मुख्य आचार्य मिलींद राजेंद्र दिक्षीत यांच्यासह मिलींद प्रमोद दिक्षीत, गौरव देशमुख, भाग्येश दिक्षीत आदींनी यागाचे पुरोहित्य केले. यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष धनंजय दिक्षितांसह पुरोहीत संघाचे सदस्य उपस्थित होते. दुपारी २ वाजता यागास पुर्णाहूती देण्यात आली.

दरम्यान मंगळवार हा देवीचा वार समजला जात असल्याने त्यात श्री कालाष्टमी कालभैरवनाथ जयंती असल्याने भाविकांची दर्शनासाठी नेहमीपेक्षा अधिक गर्दी होती. भाविकांनी मंदी परीसरात कालभैरवाष्टक, कालभैरव धान्यमंत्राचे पठन केले. दिवसभरात भाविकांसह सप्तशृंगी गड ग्रामस्थांनीही श्री कालभैरवनाथांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT