On the occasion of Ashadhi Ekadashi, the illumination of the temple is shown in the second picture of Shri Vitthal Rukmini attractive idol. esakal
नाशिक

Ashadhi Ekadashi 2023: कळवणच्या प्रती पंढरपूर विठ्ठल मंदिरात जय्यत तयारी! विविध कार्यक्रमांचे आयोजन

आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Ekadashi 2023 : शहराचे आराध्य दैवत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रती पंढरपूर समजले जाणाऱ्या श्री विठोबा महाराज मंदिरात आषाढी एकादशी निमिताने जय्यत तयारी करण्यात येत आहे.

एकादशीनिमित्त येथील मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच दर्शनासाठी बॅरिकेट लावण्यात येऊन मंदिर परिसरात वॉटरप्रूफ मंडप लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

गुरुवारी (ता.२९) पहाटे महापूजा ,गीतापठन ,जिल्ह्यातील विविध भागातून येणाऱ्या दिंडीचे आगमन व स्वागत, मान्यवरांच्या हस्ते महाआरती ,महाप्रसाद वाटप ,भजन ,कीर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री विठोबा महाराज देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी दिली. (Kalavan prati Pandharpur Vitthal Temple prepares for Organizing various events on Ashadhi Ekadashi 2023 nashik news)

कळवण येथील गांधी चौकात शेकडो वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेले श्री विठोबा महाराज मंदिराचा जिर्णोधार व प्राणप्रतिष्ठा फेब्रुवारी २०१२ मध्ये झाली होती.

कळवणकरांचे ग्रामदैवत असलेल्या श्री विठोबा महाराजाचे मंदिर भव्यदिव्य असावे अशी संकल्पना २००९ मध्ये पुढे आल्यानंतर ट्रस्टची स्थापना होऊन शहरातील दानशूर, विविध संस्था, संघटना यांनी आर्थिक मदत दिल्याने पंढरपूरच्या धर्तीवर प्रतिपंढरपूर श्री विठोबा महाराज मंदिर कळवण शहराच्या वैभवात भर घालणारे तयार झाले.

अष्टकोनी गाभारा, ६१ फुट पांडुरंग कळस, ज्ञानेश्वर व नामदेव असे ३१ फूट दोन कळस मंदिरावर आहे. मुख्य कळसाला दीडशे ग्राम सोन्याचा मुलामा असून नामदेव महाराज पायरी, महाद्वार, कळवणचा राजा श्री गणेश मंदिर, अशी मंदिराची रचना आहे.

श्री क्षेत्र पंढरपूर येथील सदगुरु सखाराम महाराज अमळनेरकर संस्थान यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या स्वयंभू अशा घडीव पाषाणातील मूर्ती दिल्या आहेत. मुर्तीकरिता मुंबई येथून खास पद्धतीने सोन्या चांदीचे दागिने बनविण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्ह्यातील बहुतांशी विठ्ठल भक्तांना पंढरपूर येथे आषाढी निमित्ताने जाणे शक्य होत नसल्याने जिल्ह्यातील हजारो भाविक श्री विठोबा महाराज मंदिरात नतमस्तक होतात.

आषाढी एकादशी निमित्ताने गुरुवारी पहाटे ५ वाजता ताकाटे परिवार हस्ते महापूजा होणार आहे. सकाळी ९ ते १० गीतापठण कार्यक्रम होणार आहे ,दुपारी जिल्ह्यातून विविध भागातून दिंड्या येणार असून त्यांचे मंदिर परिसरात स्वागत केले जाणार आहे.

सायंकाळी ६ वाजता सामुदायिक हरिपाठ होणार आहे . त्यानंतर रात्री कीर्तनकार नितीन महाराज मुडावदकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार असल्याने कळवण परिसरातील विठ्ठल भक्तांनी विविध धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन श्री विठोबा महाराज मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी केले आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : सातारा महामार्गावरील खांबटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT