File Photo esakal
नाशिक

Nashik News: कळमुस्ते, चिमणपाडाच्या प्रवाही वळण योजनेस मान्यता! गोदावरी खोऱ्यामध्ये वळविणार इतके पाणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कळमुस्ते (ता. त्र्यंबकेश्‍वर) शिवारातील डोंगरगाव-दुगारवाडी गावाजवळ दमणगंगा खोऱ्यातील ६९०. १० दशलक्ष घनफूट पाणी पावसाळ्यात गोदावरी खोऱ्यात १३. ६८ किलोमीटर लांबीच्या बोगद्याव्दारे वळविण्याच्या ४९४ कोटी ९८ लाख रुपये खर्चाच्या प्रवाही वळण योजनेला जलसंपदा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

तसेच पश्‍चिम वाहिनी नद्यांमधून अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून गोदावरी खोऱ्यात २९.२९ दशलक्ष घनफूट पाणी आणण्यासाठी चिमणपाडी (ता. दिंडोरी) प्रवाही वळण योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही योजना ३६ कोटी ४० लाख रुपयांची आहे. (Kalmuste Chimanpada flow diversion scheme approved So much water will be diverted into Godavari valley Nashik News)

जनहित याचिकेच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयातील २३ प्रवाही योजनांमध्ये या दोन्ही प्रवाही वळण योजनांचा समावेश आहे. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या २५ फेब्रुवारी २०२१ आणि ४ डिसेंबर २०२० च्या बैठकीत दोन्ही योजनांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे.

वित्त विभागाच्या सहमतीने हे प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर केले होते. मंत्रिमंडळाने ४ जुलै २०२३ च्या बैठकीत दोन्ही प्रकल्पांना मान्यता दिली आहे.

दमणगंगा नदीच्या स्थानिक नाल्यावर कळमुस्ते वळण योजना प्रस्तावित आहे. धरणापर्यंत पाण्याचा एकूण विसर्ग ८१७. २२ दशलक्ष घनफूट असून त्यापैकी १२७. ०६ दशलक्ष घनफूट पाणी स्थानिक वापरासाठी मृत साठ्यासह गृहीत धरुन गोदावरी खोऱ्यात पाणी वळवले जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चिमणपाडा योजनेच्या मूळ मंजूर आराखड्यात पाणलोट क्षेत्र ०.८५७ चौरस किलोमीटर असून त्यामध्ये दोन नाले आहेत. त्यावर दोन सॅडल प्रस्तावित आहेत.

दोन सॅडलमध्ये १५.७१ दशलक्ष घनफूट पाणी स्थानिक वापरासाठी ठेऊन उर्वरित पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार आहे.

चिमणपाडा योजनेचा एकूण पाणीवापर १. ३३४ दशलक्ष घनमीटर असून त्याद्वारे करंजवण धरणाचे १११ हेक्टर सिंचन क्षेत्र पुनर्प्रस्थापित होणार आहे.

आळंदी धरणाचा संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ८१६ दशलक्ष घनफूट इतका आहे. त्यामुळे जवळपास आळंदी धरणाइतके पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

में यूपी से हू; मराठी नही आती...! मुंबई मेट्रोवनमधील कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, मराठी एकीकरण समितीकडून करेक्ट कार्यक्रम

Ranji Trophy 2024: साई सुदर्शनचे द्विशतक, Ishan kishan चे शतक, तर वॉशिंग्टन सुंदरची तुफान फटकेबाजी

आणि त्याने लगेच पाण्यात उडी मारली... 'राजा राणी'च्या सेटवर सुरज चव्हाणने वाचवला एकाचा जीव

Worli Assembly Constituency: वरळीत तिरंगी लढतीची शक्यता, आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढणार!

Latest Maharashtra News Updates : सायन-पनवेल उड्डाणपुलाखाली उभारणार स्वच्छतागृहे

SCROLL FOR NEXT