Drama esakal
नाशिक

Kamgar Kalyan Natya Spardha : सद्य परिस्थितीवर भाष्य ‘शक्ती शिवाचा तेजोगोल’

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सध्याच्या सामाजिक परिस्थितीला उद्देशून राज्यकर्ते, जनता अन् दुष्ट शक्ती यांची पौराणिक कथेच्या माध्यमातील मांडणीचे प्रकटीकरण करणारी नाट्यकृती म्हणजे ‘शक्ती शिवाचा तेजोगोल’.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६८ व्या नाट्य स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र देवळाली गावतर्फे हे नाटक सादर झाले. नेताजी भोईर लिखित या नाटकाचे दिग्दर्शन वरुण भोईर यांनी केले. (Kamgar Kalyan Natya Spardha Commentary on current situation shakti shivacha tejogol nashik news )

इंद्र-राज्यकर्ते, नारदमुनी जनता, तारकासुर- अतिरेकी शक्ती अशा व्यक्तिमत्त्वाची गुंफण लेखकाने केली आहे. तारकासुरा सारख्या जन्माला येणाऱ्या अतिरेकी शक्तींना रोखणे आणि प्रतिकार करणे अथवा जन्मालाच न येऊ देणे या साठी इंद्राची झालेली हतबलता, शिवशंकरांनी धारण केलेला क्रोधी स्वभाव, पुत्र कार्तिकेयचा लांबविलेला जन्म तर नारदमुनीने केलेली चातुर्य मध्यस्थी यांचा सुंदर मिलाप म्हणजे ‘शक्ती शिवाचा तेजोगोल’.

दिनेश जोशी, स्वप्ना विंगळे, रुद्र ओहोळ, अभिजित काळे, किरण भोईर, विलास गायकवाड, सुरभी सोनार- भोईर, अमोल थोरात, स्नेहा संगीता अविनाश, विनोद सूर्यवंशी, दत्ता शिंदे, राजेंद्र गामणे, नारायण माळी, विनायक गीत, जयश्री त्रिपाठी, गीतेश देशमुख, अजय जाधव, नीलेश ओहोळ, मुस्कान सोनी, पूर्वा शिंदे, दिशा पटेल, मानसी गायकवाड, उत्कर्षा घोडके, श्रेया रुईकर, पूजा कुलकर्णी या कलावंतांनी या नाटकात भूमिका साकारल्या.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

किरण भोईर यांनी नेपथ्य तर चैतन्य गायधनी यांनी प्रकाशयोजना साकारली. वरुण भोईर यांनी नाटकाला संगीत दिले. पात्रांच्या रंगभूषा माणिक कानडे, सुरेश भोईर यांनी तर वेशभूषा संजय जरीवाला, संगीता भोईर यांनी साकारल्या.

रोहीत जंजाळे यांनी नृत्य दिग्दर्शन केले. सहप्रकाश- ध्वनी सहाय्य नीतेश विश्‍वकर्मा, जितेश दर्वे यांनी केले तर सुनंदा रायते, नामदेवराव ओहोळ, प्रेरणा देशपांडे, विकेश ससाणे यांनी रंगमंचा व्यवस्था केली.

आजचे नाटक

स्पर्धेत शनिवारी (ता. ७) कामगार कल्याण केंद्र, संगमनेरतर्फे ‘फेंट’ नाटक सादर होणार आहे. चैतन्य सरदेशपांडे या नाटकाचे लेखक असून विक्रम क्षिरसागर दिग्दर्शक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे 46,178 मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT