Actors of Lalit Kala Bhavan, Jalgaon performing scenes from the play Disha in the drama festival organized by Kamgar Kalyan Mandal. esakal
नाशिक

Kamgar kalyan Natya Spardha : समाजाला दिशा दाखवणारी नाट्यकृती ‘दिशा’

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दिशा पिंकी शेख यांचा जीवन प्रवास अधोरेखित करत समाजाला एक वेगळा विचार करायला लावणारी नाट्यकृती म्हणजे ‘दिशा’. महाराष्ट्र कामगार कल्याण महामंडळाच्या ६८ व्या नाट्यस्पर्धेत ललित कला भवन, जळगावतर्फे सोमवारी (ता. ९) हे नाटक सादर झाले. शरद भालेराव लिखित या नाटकाचे दिग्दर्शन चिंतामण पाटील यांनी केले आहे. (Kamgar kalyan Natya Spardha Disha play that shows direction to the society nashik news)

तृतीयपंथी दिशा पिंकी शेख यांच्या बालपणापासून ते त्यांच्या समाजकार्यापर्यंतचा जीवनपट या नाटकातून प्रेक्षकांपर्यंत उलगडत जातो. त्यांच्या जीवनात येणारे प्रसंग, त्यातून येणारे अनुभव याचे वर्णन लेखकांने उत्कृष्ट केले आहे.

त्यांच्या जीवनप्रवासात कौटुंबिक, सामाजिक वाटचालीचा लेखाजोखा अन् त्यांनी आपल्या विचारांतून समाजमनांत घडविलेला बदल महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे ही ‘दिशा’ नाट्यरुपाने समाजाला दिशा दाखविण्याचे काम करते आहे हे प्रेक्षक अनुभवतात.

शरद भालेराव, सरिता तायडे, अरुण सानप, ययाती घोडके, नयन खैरनार, यश सोनार, सुयोग नेहेते, गौरव नारखेडे, भरत सोनवणे, उत्तमराव नेरकर, गौरव देशमुख, विजय पालवे, सोनल कपोते या कलावंतांनी या नाटकात भूमिका साकारल्या.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

प्रबुद्ध भालेराव यांनी या नाटकाचे नेपथ्य तर पीयूष रावळ यांनी प्रकाशयोजना सांभाळली. कुलदीप भालेराव यांनी नाटकाला पार्श्‍वसंगीत दिले. मीनाक्षी पाटील यांनी पात्रांच्या वेशभूषासह रंगभूषा साकारल्या. सुवर्णा नाईक, योगेश सोनार यांनी रंगमंच व्यवस्था साकारली. ललित कला भवनाचे कल्याण निरीक्षक भानुदास जोशी यांनी निर्मिती सूत्रधार म्हणून काम पाहिले.

आजचे नाटक

स्पर्धेत मंगळवारी (ता.१०) कामगार कल्याण केंद्र, शिरपूरतर्फे ‘पुन्हा सलवा जुडूम’ हे नाटक सादर होणार आहे. शरद भालेराव या नाटकाचे लेखक अन् दिग्दर्शक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT