मनमाड (जि. नाशिक) : व्यवसायानिमित्त तैवान मध्ये स्थायिक झालेल्या मनमाडच्या कांत परिवाराने तैवानमध्ये श्री गुरुनानक जयंती साजरी करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. विशेष म्हणजे तैवानमध्ये गुरुद्वारा नसल्याने मनमाडच्या गुप्तसर साहिब गुरुद्वाराच्या सहकार्याने येथील गुरुद्वारातील धार्मिक कार्यक्रमांचे थेट प्रेक्षेपण तैवानमध्ये दाखवण्यात आले.
येथील निराला स्टोअर्सचे संचालक गुरूदीपसिंग कांत आणि व्यवसायानिमित्ताने तैवान या देशात स्थायिक झालेली त्यांची मुले गुरुविंदसिंग कांत आणि मनविंदसिंग कांत यांनी श्रीगुरुनानक देवजी यांच्या जयंतीचे तैवान येथे आयोजन केले होते. तैवान देशात गुरुद्वारा नसल्याने श्रीगुरुनानक जयंती कशी साजरी करायची असा प्रश्न पडला असता यावर कांत परिवाराने तैवानमध्ये श्री गुरुनानक जयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घेतला.
या जयंतीला सहकार्य मिळावे यासाठी मनमाडच्या प्रसिद्ध गुप्तसर साहिब गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रंजीतसिंगजी यांना सांगून त्यांच्याकडून परवानगी घेऊन गुप्तसर साहिब गुरुद्वारा सहकार्याने मनमाड येथील गुरुद्वाराच्या दरबारामधील होणाऱ्या प्रत्येक धार्मिक कार्यक्रमांचे थेट प्रेक्षेपण तैवान येथे कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात आले होते. त्यामुळे तैवानमध्ये असलेल्या शीख बांधवांना मोठ्या उत्साहात श्री गुरुनानक जयंती साजरी करता आली आणि आंनद घेता आला.
विशेष म्हणजे मनमाड गुरुद्वाराचे ग्रंथजी दलेरसिंग सोनी यांना तैवान येथील श्री गुरुनानकजी जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी आणि तैवान देशात येण्यासाठी तैवान सरकारने विशेष परवानगी दिली होती. त्यांना व्हिजा मंजुर करून देण्यात आला होता.
मनमाड येथील कांत परिवाराने श्री गुरुनानकजी जयंतीनिमित्त किर्तन, प्रवचन, लंगर आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या देशाच्या भारतीय संस्कृतीचे दर्शन तैवान येथील नागरिकांना करुन दिले, या कार्यक्रमाला विविध देशातील नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे शीख समाजाची ओळख असणारी पगडी कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना बांधण्यासाठी देखील खास येवला येथुन कलाकार राजवंश सिंग आणि रणजित सिंग यांना घेऊन जाण्यात आले होते.
तैवान :
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.