Karda Construction Fraud Case : शहरातील बांधकाम क्षेत्रातील कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा यांच्या पोलीस कोठडीची मुदत उद्या, मंगळवारी (ता.७) संपते आहे. त्यामुळे कारडा यांना उद्या जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
कारडा यांच्याविरोधात उपनगर पोलिसात ४ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल १ कोटी २० लाख रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यास उपनगरच्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हेशाखेकडून अटक केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कारडा यांच्याविरोधात शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे फसवणुकीच्या ३० तक्रारी दाखल झाल्या आहेत. (Karda Construction Fraud Case Builder Naresh Karda to be brought to court today Chances of getting arrested for another crime nashik)
मुंबई नाका पोलिसात गेल्या ३० ऑक्टोबर रोजी कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा यांच्याविरोधात १ काेटी २० लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचप्रकरणी शहर आर्थिक गुन्हेशाखेने नरेश कारडा यांना अटक केली आहे.
कारडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल होताच, फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी शहर आर्थिक गुन्हेशाखेत धाव घेत कारडाविरोधात तक्रारी दाखल केल्या असून, तो ओघ अद्यापही सुरू आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी कारडा यांच्या कार्यालयातून महत्त्वाची कागदपत्रे व संगणकाची हार्डडिक्स ताब्यात घेतली आहे. कारडा यांना देण्यात आलेल्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी (ता.७) संपते आहे.
त्यामुळे कारडा यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांकडून त्यांच्या कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.
न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यास उपनगर पोलिसात दाखल गुन्ह्यांमध्ये कारडा यांना शहर आर्थिक गुन्हेशाखेकडून ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
गेल्या शनिवारी उपनगर पोलिसात कारडा यांच्याविरोधात ४ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचाही तपास आर्थिक गुन्हेशाखा करीत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.