Nashik Karda Construction Fraud Case : एक कोटी २० लाखांच्या फसवणूकप्रकरणी अटक करण्यात आलेले कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा यांच्या पोलीस कोठडीमध्ये एका दिवसाने वाढ करण्यात आली आहे.
कारडा यांनी केलेल्या आर्थिक व्यवहारांच्या तपशिलाचे कारण देत पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. कारडा यांना गेल्या ३० ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आलेली आहे. (Karda Construction Fraud Case Builder Naresh Kardas custody increased nashik crime)
मुंबई नाका पोलिसात कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा यांच्यासह मनोहर कारडा, देवेश कारडा, संदीप शहा यांच्याविरोधात १ कोटी २० लाख रुपयांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, नरेश कारडा यांचा शहर आर्थिक गुन्हेशाखेने अटक केली. गेल्या ३० ऑक्टोबरपासून कारडा पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज मंगळवारी (ता.७) संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात आणण्यात आले होते.
त्यावेळी सरकार पक्षातर्फे पोलिसांनी सदरील गुन्हयात कारडा यांच्याकडून त्यांनी केलेल्या आर्थिक व्यवहारासंदर्भात बँकेची माहिती व बनावट दस्तऐवजांबाबत तपास करण्यासाठी कारडा यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
न्या. जी.एम. कोल्हापूरे यांनी कारडा यांच्या कोठडीत बुधवारपर्यंत (ता.८) एका दिवसाची पोलीस कोठडी सुुनावली आहे. उद्या कारडा यांना पुन्हा न्यायालयात आणण्यात येईल.
दरम्यान, कारडा यांच्याविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात ४ कोटी रुपयांच्या फसवणुकप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे. त्या गुन्ह्यातही नरेश कारडा यांना अटक होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे कारडा यांची यंदाची दिवाळी पोलीस कोठडीत जाण्याची चिन्हे आहेत. मुंबई नाक्याच्या गुन्ह्यात संशयित असलेले मनोहर कारडा यांनी आत्महत्त्या केली आहे तर, देवेश कारडा यांना अटकपूर्व जामीन मंजूर असून, संदीप शहा पसार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.