kartiki ekadashi 2023 Baban Ghuge leg pain gets cured in pandharpur wari nashik news esakal
नाशिक

Pandharpur Wari: 15 वर्षांपासूनची पंढरपूरची वारी आली फळाला! विठूमाऊलीच्या कृपेने पायाचे दुखणे झाले बरे

दिगंबर पाटोळे, सकाळ वृत्तसेवा

Pandharpur Wari : पंधरा वर्षापूर्वी पायी वारी करताना पायाचे स्नायू दुखत असल्याने गाडीत बसून आषाढी वारीला निघालेले दिंडोरी तालुक्यातील माळे दुमाला येथील बबन घुगे हे पुढे भक्तिरसात टाळ मृदुंगाच्या गजरात विठुरायाची भजन म्हणत पायी वारीत सामील झाले. आणि त्यांचे पायाचे दुखणे पळून गेले.

तेव्हापासून कोरोनात बंद असलेली वारी वगळता सर्व वाऱ्या त्यांनी पायी केल्या असून तब्बल १८ ते २० तास दर्शन रांगेत राहून विठुरायाचे दर्शन घेतले आहे. (kartiki ekadashi 2023 Baban Ghuge leg pain gets cured in pandharpur wari nashik news)

आषाढीला पायी तर कार्तिकीला दोन दिवस अगोदर बस ने जात दर्शन रांगेत तासनतास थांबत विठुरायाचे दर्शन घ्यायचे या निश्चयाने दरवर्षी जाणारे बबन घुगे (वय ७६) व वत्सला घुगे यांना यंदा सोळा तास दर्शन रांगेत असताना विठुरायाचे कृपेनेच कार्तिकी एकादशी पूजेचा मान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे .

दिंडोरी तालुक्यातील दुर्गम भागातील माळे दुमाला येथील विठोबा घुगे यांचे शेतकरी कुटुंब हे वारकरी संप्रदायाचे असून त्यांचे पुत्र बबन घुगे हे ही विठ्ठल रुख्मिणी चे निस्सीम भक्त आहे. त्यांच्या पत्नी वत्सला, मुले अण्णासाहेब, सुभाष, कन्या ललिता व सूना, नातू, पणतू सारे कुटुंब विठ्ठल भक्त आहेत.

तसे हे दांपत्य अनेक वेळा पंढरपूरला जावून विठूरायाचे दर्शन घ्यायचे. परंतु पंधरा वर्षापूर्वी श्री निवृत्तीनाथ रथाचे मागील सिध्देश्वर दिंडी शिवनई क्रमांक १७ चे चालक हभप ज्ञानेश्वर महाराज गटकळ, विनेकरी हभप वसंत महाराज गटकळ शिवनई यांचेसोबत पायी आषाढी वारी सुरू केली. पंधरा वर्षापूर्वी पहिली पायी वारी पायाच्या स्नायू विकाराने होणार नाही.

पण दिंडीत काही अंतर पायी काही गाडीत बसून करू म्हणून वारी सुरू केली. सुरवातीला त्रास ही झाला काही अंतर गाडीत बसून प्रवास सुरू झाला. पण पुढे भक्तिमय वातावरणात भजनात दंग होत पायी चालता चालता पायाचे दुखणे बरे झाले ते कायमचेच. अनेक डॉक्टर करून पाय बरा झाला नाही पण पायी वारित जाण्याच्या निश्चयाने विठू माऊलीच्या कृपेने पाय बरा झाला असा प्रत्यय त्यांना आला अन तेव्हापासून त्यांची वारी अखंडपणे सुरू राहिली.

कधीही हे दांपत्य वारी काळात आजारी पडले नाही. तर दर महिन्याच्या एकादशीला त्र्यंबकेश्वर ची ते वारी करतात. गावातील हरिनाम सप्ताह भजन कीर्तन सोहळ्यात घुगे दांपत्य व कुटुंबीय नेहमी सहभागी होतात. त्यांना मिळालेल्या मानाने गावासह तालुक्याला ही मोठा आनंद झाला. पहाटे पासून अनेकांनी सोसियल माध्यमात सदर बातमी प्रसारित करत या दांपत्याचे अभिनंदन केले.

कार्तिकी वारीला आई वडील नियमित पणे गेलेले सध्या मोबाईल मुळे तसा सातत्याने संपर्क होत असताना मंगळवारी रात्री कार्तिकी वारीला यंदा मोठी गर्दी आहे. दर्शन रांगेला लागतोय एकादशीच्या दिवशी दर्शन होईल असा वडिलांशी संवाद झाला.अन बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास पंढरपूर हून तहसीलदार यांचा फोन आला की आपले आई वडिलांना विठ्ठल पूजेचा मान मिळाला असून आपण सदर सोहळा टिव्ही वर लाईव्ह बघा असे सांगितले.

अन दादा व आईंच्या विठूरायाच्या अढळ श्रध्देने थेट विठुरायाने भेटीस बोलवत पूजा करण्याचे भाग्य दिल्याची अनुभुती आली. तसे सुरवातीला हे स्वप्नच वाटले पण हे विठुरायाने आम्हा कुटुंबाला मोठा मान दिला. सारे कुटुंब नातेवाईक मित्र परिवारास ही बातमी कळवली सर्वांना मोठा आनंद झाला.

आमचे कुटुंब तर रात्रभर झोपले नाही टिव्ही पुढे बसून होतो. अखेर पहाटे आई दादा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे सोबत पूजा करताना टिव्ही वर बघितले अन जो आनंद झाला तो शब्दात व्यक्त होणारा नाही अशी प्रतिक्रिया आज पहाटे विठुरायाची शासकीय पुजाचे दिंडोरी तालुक्यातील माळे दुमाला येथील मानकरी सौ. वत्सला व श्री बबन विठोबा घुगे यांचे पुत्र अण्णासाहेब व सुभाष यांचेसह साऱ्या कुटुंबाने दिली.

घुगे यांना मिळालेल्या मानाचा आनंद त्यांचे कुटुंब, वारकरी संप्रदाय , मित्र परिवार, नातेवाईक, गावकरी व ते त्या दिंडीत जातात त्यांना ही झाला. अनेकांनी पहाटे हा सोहळा टिव्ही वर बघत जय हरी विठ्ठल चा गजर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT