Wheat and Harbhara Crop esakal
नाशिक

Nashik News: कसमादेत शेतकऱ्यांनी गव्हासह हरभऱ्याकडे फिरवली पाठ! कांदा लागवडीने रब्बीचे क्षेत्र 50 टक्क्यांनी घटणार

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : तालुक्यासह कसमादेत दुष्काळी परिस्थिती असली, तरी बहुतांशी शेतकऱ्यांकडे विहीर, शेततळे आदी माध्यमातून पाणी उपलब्ध आहे. कांद्याला मिळत असलेला भाव पाहता, रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी गहू व हरभरा या पारंपरिक पिकांकडे पाठ फिरवली आहे.

उपलब्ध पाण्याच्या भरवशावर लेट खरीप व उन्हाळी कांदा लागवड करण्यात आली आहे. कसमादेत एक लाख एकरापेक्षा अधिक क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे.

रब्बी हंगामात आत्तापर्यंत पाच टक्के क्षेत्रावर गहू, हरभऱ्याची पेरणी झाली. कांद्यामुळे संपूर्ण कसमादेत रब्बीचे क्षेत्र ५० टक्क्यांनी घटणार आहे. (Kasmade farmers turned their backs on wheat and gram Onion cultivation will reduce rabi area by 50 percent Nashik News)

कसमादेत डाळिंब व कांदा ही प्रमुख पिके असून रब्बी हंगामात गहू, हरभरा या पारंपरिक पिकांचे उत्पादन घेतले जाते. मालेगाव तालुक्यात रब्बीचे क्षेत्र २१ हजार एकर आहे. आत्तापर्यंत ९०० ते ९५० एकरवर गहू, हरभरा लागवड झाली.

दिवाळी उलटली, तरी थंडी जाणवत नाही. किमान तापमान १९ ते २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान, आहे. पुरेशी थंडी पडली नाही, तर या पिकांवर त्याचा परिणाम होऊ शकेल. यावर्षी कमी पावसामुळे हिवाळ्यात बोचरी थंडी पडते की नाही ? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

उन्हाळी व नवीन लाल कांद्याला बाजारात चांगला भाव मिळत आहे. दोन महिन्यापासून कांद्याचे भाव तेजीत आहेत. कांद्याला मिळत असलेला भाव पाहता, शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभराऐवजी लेट खरिपात कांदा लागवड केली आहे.

मालेगाव तालुक्यात १० हजार ४७५ एकरवर खरीप कांदा लावण्यात आला आहे. लेट तथा रांगडा कांदा २७ हजार ६९० एकरावर लागवड झाला आहे. दिवाळीनंतर रब्बी तथा उन्हाळी कांदा लागवड सुरू झाली आहे.

आत्तापर्यंत ७ हजार ५०० एकरावर लागवड झाली आहे. खरीप, लेट खरीप-रांगडा व रब्बी-उन्हाळी असे मिळून मालेगाव तालुक्यात ४५ हजार ६६५, बागलाण तालुक्यात २५ हजार, देवळा तालुक्यात १७ हजार ५००, नांदगाव तालुक्यात ९ हजार ६२५ एकर लागवडीचा समावेश आहे. चांदवड व कळवण मध्ये काही प्रमाणात कांदा लागवडीची ‘धूम' आहे.

कांदा लागवडीमुळे रब्बीचे क्षेत्र घटणार असल्याने भविष्यात गव्हाचे भाव वाढतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. खुल्या बाजारात सध्या ३ हजार ते ३ हजार २०० रुपये क्विंटल असा गव्हाचा भाव आहेत.

नव्या वर्षात हा भाव ४ हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा लागवडीची परिस्थिती पाहता, कृषी विभागाने बियाण्यांवर अनुदान जाहीर केले. मात्र या योजनेला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही.

शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने कांदा लागवड केली आहे. निसर्गाने साथ दिल्यास व भाव कायम राहिल्यास बळीराजाला कांद्यामुळे दुष्काळी परिस्थितीत दिलासा मिळू शकेल.

"कांदा लागवडीमुळे रब्बीतील गहू, हरभऱ्याचे क्षेत्र ५० टक्क्यांनी घटले आहे. सरकारने गहू बियाण्यात किलो पाच रुपये व हरभरा बियाण्यात किलोला २५ रुपये अनुदान जाहीर केले आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. डिसेंबरच्या सुरुवातीपासून ते १५ जानेवारीपर्यंत चांगली थंडी पडू शकेल. त्याचा फायदा रब्बी पिकांना होईल."

- गोकूळ आहिरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

RCB Squad IPL 2025: काहे दिया परदेस! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं 'विदेशी' प्रेम; भुवनेश्वर, कृणाल पांड्याची निवड ठरणार मास्टरस्ट्रोक

Ajit Pawar: अजित पवार विनासुरक्षा 'देवगिरी'तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग

IPL Mega Auction 2025: ३० लाख ते ३.८० कोटी! युवीच्या 6 Ball 6 Six विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या Priyansh Arya साठी तगडी चुरस

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

SCROLL FOR NEXT