Teachers and officials present when the students freed from poverty in the primitive Katkari community of Ubhade settlement join the ashram school. esakal
नाशिक

Nashik News : ‘ती'च्या मृत्यूने कातकरी बालकांची वेठबिगारीतून मुक्तता!

सकाळ वृत्तसेवा

घोटी (जि. नाशिक) : टिच भर पोटासाठी दोन-तीन हजारांत पोटच्या लेकरांना मेंढपाळांना विकण्याची नामुष्की आलेल्या आदिम कुटुंबातील शालाबाह्य अल्पवयीन मुलांची श्रमजीवी संघटना व प्रशासनाने सोडवणूक केली होती.

या सर्व शालाबाह्य मुलांना शहापूर येथील शासकीय माध्यमिक निवासी आश्रमशाळेत प्रवेश मिळाला आहे. शाळेत प्रवेश मिळाल्याने यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून आनंद वाहत होता. (katkari tribal community children have admitted to Government Secondary Residential Ashram School at Shahapur Nashik News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

ऑगस्ट महिन्यात उभाडे (ता. इगतपुरी) वस्तीवरील गौरी आगीवले या दहा वर्षीय मुलीचा मेंढपाळांनी वेठबिगारीस नेऊन मारहाण केल्याने मृत्यू झाला होता. ‘सकाळ' ने याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या घटनेनंतर राज्यभर खळबळ उडाली होती. विधानसभेत आमदार हिरामण खोसकर यांनी लक्षवेधी करत सभागृहाचे लक्ष वेधले होते.

सदर वस्तीला श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष तथा आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, जिल्हाधिकारी गंगाथरण डी., अपर पोलिस अधीक्षक माधुरी कंगणे, तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी भेट देत आदिम कातकरी कुटुंबीयांना मूलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, रोजगार देण्याबाबत आश्वासन दिले होते. यानंतर श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येऊन वेठबिगारी कायद्यानुसार इतर जिल्यातील सात संशयित यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.

यानंतर यामध्ये प्रामुख्याने तेरा विद्यार्थी निवासी आश्रमशाळेत रुजू करण्यात आले आहे. यावेळी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे,तालुकाध्यक्ष गोकूळ हिलम, सचिव सुनील वाघ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT