Nashik News : ‘लव जिहाद’ वर आधारित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणीचे निवेदन सकल हिंदू समाजतर्फे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या नावाने देण्यात आले आहे. (Kerala Story movie demands tax exemption Statement to District Collector on behalf of Sakal Hindu Samaj Nashik News)
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
सत्य घटनेवर आधारित ‘केरला स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात गरीब घरातील मुलींना पैशांचे व विवाहाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जाते.
विवाहानंतर या मुलींचे धर्मांतर होते किंवा मानसिक, शारीरिक त्रास दिला जातो. त्यामुळे मुलीसह तिचे सर्व कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता अधिक असते. आशा प्रकारांमुळे अनेक मुलींनी आत्महत्या केल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्रातील जनतेला ‘लव जिहाद’ हा विषय समजावा यासाठी हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर यशोदा पर्वतकर, सुजाता जोशी, रुजुता चव्हाण, सुरेखा पेखळे, रेवती कुलकर्णी, कृष्णा गोसावी, समृद्धी जोशी आदींची स्वाक्षरी आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.