Khanderao Chaudhary throwing grain to crows gathered in flocks esakal
नाशिक

Nashik News : दिक्षीच्या खंडेराव चौधरींशी कावळ्यांची जमलीय गट्टी! दाणे देण्याची झालीय दशकपूर्ती

उत्तम गोसावी

ओझर (जि. नाशिक) : दिक्षी (ता. निफाड) येथील किराणा दुकानदार खंडेराव चौधरी यांच्याशी कावळ्यांची गट्टी जमलीय. त्यांच्या दुकानापुढे रोज सकाळी भरते कावळ्यांची शाळा. कावळ्यांसाठी दाणे देण्याची त्यांची दशकपूर्ती झालीय.

तहानलेल्या कावळ्याची गोष्ट सर्वांना माहिती आहे. चातुर्याने तळाशी असलेले पाणी खडे टाकून वर आणत ते पाणी पिऊन तृप्त झालेल्या कावळ्याचा माझ्या परिश्रमाचे फळ असल्याचा भाव आहे. त्याचअनुषंगाने संस्कृतमध्ये ये प्राणिनः संसारे उद्यमंत , ते एव सफलाः भवन्ति । असे म्हटले आहे. अर्थात, परिश्रम घेणारे प्राणी यशस्वी होतात. (Khanderao Chowdhury decade to feeding grains to crows at Dikshi Nashik News)

सामान्यत: कावळा माणसांशी मैत्री करत नाही. पोपट पाळतात अन् दर वर्षीच्या पितृपक्ष पंधरवड्यात मातृ-पितृ ऋण व्यक्त करत असताना दशक्रिया विधीला ‘काव-काव' हवाहवासा वाटतो. घास शिवला नाही, तर गाईला घास खायला घातला जातो.

मात्र एका दिवसापेक्षा अधिक काळ कावळ्याला दाणे खायला दिल्यास त्यांच्याशी भावनिक बंध जोडला जातो. याचीच प्रचिती श्री. चौधरी घेत आहेत. ते मूळचे शेतकरी आहेत. शेतीला जोड धंदा म्हणून किराणा दुकान चालवतात.

दररोज सकाळी साडेसहा कावळ्यांचा थवा दाणे टिपण्यासाठी दुकानापुढे येतात. कावळ्यांचा थवा येण्यापूर्वी अर्धा तास श्री. चौधरी दुकानात येतात. ते दिसताच, कावळे जोरजोरात ‘काव-काव’ सुरू करतात. मग चौधरी दुकानातील फरसाण, बटर, तांदूळ असे कावळ्यांना खायला टाकतात. खाऊ चोचीत घेत एकामागून एक कावळा उडून जातो. थव्यामध्ये कावळ्यांची संख्या शंभरीच्या पुढे पोचली आहे.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

पक्ष्यांना खायला-प्यायला देणे हे पुण्य समजत असल्याने श्री. चौधरी कावळ्यांना रोज दाणा-पाणी घालतात. कावळ्यांना खाऊ-पिऊ घातल्याने आपल्याला कधी कमी पडणार नाही. ‘ही माझी पुण्याई' या भावना श्री. चौधरी यांची आहे. मात्र त्यासंबंधीचा कसल्याही प्रकारचा गाजावाजा त्यांनी केलेला नाही. अखंड सेवेचा भाव पाहत ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्यांच्या नजरेतून सुटत नाही.

चतुर कावळा
काक चेष्टा बको ध्यानं

संस्कृत श्‍लोकामधील हा मुद्दा आहे. अर्थात, कावळ्यासारखे चतूर आणि बगळ्यासारखे लक्ष आवश्‍यक मानले गेले आहे.

"माणसं दशक्रिया विधी, पितृपक्ष पंधरवडा आणि सर्वपित्री अमावस्येला कावळ्यांची घास देण्यासाठी प्रतीक्षा करतात. तसेच ‘पशू-पक्षी आणि प्राण्यांवर दया करा‘, ‘एकदाणा चिमणीसाठी‘ या म्हणी तात्पुरत्या आहेत. मात्र कावळा चाणाक्ष आहे. त्याला दररोज दाणे-पाणी दिल्यास ते आपले मित्र बनतात. रोज सकाळी धान्य टाकतो. त्यामुळे परिसरात जात असताना जवळ येऊन कावळे साद घालतात. त्यातून शांती मिळते." - खंडेराव चौधरी (दीक्षी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT