Cultivation has accelerated in Rajapur due to rain on Wednesday evening. esakal
नाशिक

Kharif Season Preparation: यंदा तृणधान्यासह मका, सोयाबीनचा पीक पॅटर्न! पावसावर ठरणार पिकांचे क्षेत्र

संतोष विंचू

Kharif Season Preparation : पाऊस कसा पडतो त्यावर तालुक्यांतील खरिपाच्या पिकांचा पॅटर्न ठरतो. यंदा अद्यापही पावसाने दर्शन दिले नसल्याने अनेक पिकात फेरबदल होण्याचा अंदाज आहे.

असे असले तरी बाजरी, मका व सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होणार हे निश्चित आहे. मका तालुक्याचे लाडके पीक बनल्याने यंदा मोठी वाढ अपेक्षित आहे. (Kharif Season Preparation Crop pattern of maize soybeans with cereals this year Area of ​​rainfed crops nashik news)

पावसाच्या स्थितीवर येथील पीक पॅटर्न देखील बदलता असतो, मात्र यंदा मोठा बदल देखील जाणवू शकतो. विशेषतः कपाशीचे क्षेत्रात घट होऊन मक्याचे क्षेत्र वाढू शकते.

बाजारात मका, सोयाबीन, कपाशीच्या भावात तेजी असल्याने यंदा या तीन पिकांच्या क्षेत्रात वाढ होणार आहे.शिवाय संपूर्ण वर्षभर कांद्याला भाव मिळाला नसून उन्हाळ कांदा सडत असल्याने लाल कांद्याला भाव मिळेल या आशेवर दरवर्षीप्रमाणे लाल कांद्याचे क्षेत्रही वाढतेच राहणार आहे.

तालुक्याचे जून ते ऑक्टोबर पर्यंतचे सरासरी पर्जन्यमान ५१२ मिलिमीटर आहे. इतका पाऊस झाला तर खरिपाची शाश्वती नक्कीच असते. गतवर्षी विक्रमी पावसामुळे खरिपातील मका, कापूस, कांदे व इतर सर्वच पिके पाण्यात अक्षरशः सडली होती.

आता खरीप पूर्वमशागतीला सुरवात झाली आहे. अवर्षणप्रवण तालुक्यात मागील तीन-चार वर्षात मक्याच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून जिल्ह्यात नंबर एकवर येथे मका घेतला जातो.

पांढऱ्या सोन्यासह सोयाबीनचे भाव स्थिर असले तरी थोडे समाधानकारक असल्याने यावर्षी कपाशी व सोयाबीनचे क्षेत्र टिकून राहील. वेळेत पाऊस आला तर कांदा लागवडीसाठी मुगाचे क्षेत्र वाढेल तर पाऊस लांबल्यास कडधान्य व बाजरीच्या क्षेत्रात वाढ होऊ शकेल.

चिंता वाढतेय, लगबग सुरु!

यंदा अद्यापही पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे चिंता वाढली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शेतकरी बी-बियाणे नियोजन व खते खरेदी करत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावल्यास तालुक्यातील शेतकरी मका लागवड व इतर पेरण्या सुरवात करतात, पण अद्यापही उन्हाळाच भासत असल्याने पिकांच्या पेरणीचा पॅटर्न बदलण्याची वेळ येऊ शकेल.

चांगला हमीभाव व उत्पन्नाची हमी असल्याने तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर यंदाही मक्याचीच लागवड होणार आहे. तालुका लाल व रब्बीतील रांगड्या कांद्याचे आगार असल्याने केवळ आशावादावर कांद्याचे क्षेत्र वाढणार आहे.

नगदी भाजीपाल्याकडे शेतकरी वळत आहेत. मागील वर्षी तालुक्यात टोमॅटोच्या लागवडीखालील क्षेत्रात घट झाली होती. यंदाही कल अल्प आहे, टोमॅटो लागवडीसाठी शेतकऱ्यांनी रोपे बुक केली आहे.

पेरणीचे नियोजन झाले!

तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ७० हजार ५९७ हेक्टरवर पोहोचले असून ७२ हजारच्या आसपास हेक्टरवर खरीप पेरणीचे उद्दिष्ट आहे. खरीप हंगामावर शेतकऱ्यांची पुढील गणित अवलंबून असल्याने नांगरणीची कामे पूर्ण झाली आहेत.

एखादा पाऊस पडताच पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना गती येणार आहे. तालुक्यात मका, मूग, सोयाबीन, कापूस, भुईमूग, तूर, उडीद आदी पिकांची ७० हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे.

तृणधान्यासह पिकांच्या उत्पादन वाढीसाठी मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक व कृषी विभागाने जनजागृती केल्याचे कृषी सहाय्यक साईनाथ कालेकर यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

खतांचे नियोजन करावे!

खरीप हंगामात दरवर्षी येथे रासायनिक खतांचा तुटवडा जाणवतो.यासाठी तक्रारी व आंदोलने होतात.त्यामुळे कृषी

अधिकाऱ्यांनी आतापासूनच सतर्क होऊन खतांचे नियोजन करण्याची गरज आहे.अन्यथा दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांची गैरसोय व काळाबाजार ठरलेलाच आहे.

अशी होईल खरिपाची पेरणी..

पीक - सर्वसाधारण क्षेत्र - मागील वर्षीची पेरणी - संभाव्य क्षेत्र

ज्वारी - ४ - ०० - ९

बाजरी - ९७३० - ५१२५ - १००५०

मका - ३५११९ - ३८९०६ - ३६००१

तूर - ११२८ - २१२ - ६०२

मूग - ५२४० - ७३६५ - ५३१०

उडीद - ५२५ - ४७ - ४६२

भुईमूग - २६१४ - २५१९ - २६५२

सोयाबीन - १००४२ - १५००५ - ६५९५

कापूस - ११०३९ - ३६९१ - ८४२२

ऊस - ४६२ --- ०० -

एकूण - ७०५९७ - ७२८७० - ७०१३५

"यंदा खरिपात सरासरी क्षेत्र तेवढेच असेल पण इतर क्षेत्र कमी होऊन तृणधान्य वाढतील. बाजरी, ज्वारी क्षेत्रात मागील वर्षापेक्षा ३० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्ताने तालुक्यात कृषी विभागाचे प्रचार प्रसिद्धी व पीक प्रात्यक्षिके यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे. पावसावर पेरणीचे नियोजन ठरेल."

- मंगेश जंगम, तालुका कृषी अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाण्यात केदार दिघेंचे डिपोझिट जप्त

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT