kharif sowing Esakal
नाशिक

Monsoon: पावसाअभावी खरीप पेरण्या गेल्या वर्षीपेक्षा 10 टक्क्यांनी कमी; 1 हजार 300 गावे- वाड्या तहानलेल्या

पर्जन्यमान तुलनात्मक ५८ टक्के कमी

सकाळ वृत्तसेवा

Monsoon Crisis : राज्यात गेल्या वर्षी १८ जुलैला १३५.१ टक्के पाऊस झाला होता. यंदा मात्र आतापर्यंत त्या तुलनेत ५८ टक्क्यांनी म्हणजे ७७.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मॉन्सूनचा विलंब आणि पावसातील खंडाचा विपरित परिणाम खरिपाच्या पेरण्यांवर झाला.

पाऊस होईल तसे शेतकऱ्यांनी पेरणीला पसंती दिल्याने ७४ टक्के क्षेत्रावर राज्यात पेरण्या उरकल्या आहेत. मात्र, गेल्या वर्षीचा विचार करता, ही पेरणी ९.८३ टक्क्यांनी कमी आहे.

त्याचवेळी राज्यातील एक हजार ३२० गावे-वाड्या तहानलेल्या असल्याने ३०९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. (Kharif sowing 10 percent lower than last year due to lack of monsoon rain 1 thousand 300 villages and mansions thirsty nashik)

विभागनिहाय आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी पुढीलप्रमाणे असून, (कंसात गेल्या वर्षी १८ जुलैपर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी दर्शवते) : कोकण- ९०.१६ (११८.४), नाशिक- ६७.६ (१२३.६), पुणे- ४३.३ (९५.८), छत्रपती संभाजीनगर- ७१.२ (१६७.७), अमरावती- ७४.५ (१४०.४), नागपूर- ८९.१ (१७०.२).

पावसाअभावी धरणांतील साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत अद्याप २९.३५ टक्क्यांनी कमी आहे. राज्यातील मोठे, मध्यम, लघू अशा एकूण दोन हजार ९९१ धरणांमध्ये आतापर्यंत ३३.०९ टक्के साठा झाला. गेल्या वर्षी हा जलसाठा ६१.४४ टक्के होता.

विभागनिहाय धरणांची संख्या आणि त्यातील आताच्या साठ्याची टक्केवारी पुढीलप्रमाणे असून, (कंसात गेल्या वर्षीच्या साठ्याची टक्केवारी दर्शविते) : नागपूर- ३८३- ४९.२३ (५९.२३), अमरावती- २५९- ४३.३६ (६१.२३), छत्रपती संभाजीनगर- ९२०- २४.०३ (५३.३३), नाशिक- ५३५- ३२.६६ (५७.५४), पुणे- ७२१- २४.२५ (५५.५४), कोकण- १७३- ५८.५५ (८१.७४).

बाजरी, कपाशी, तुरीचे क्षेत्र वाढणार

पावसाच्या विलंबामुळे मूग, उडीद, ज्वारीच्या कमी झालेल्या क्षेत्रात आता शेतकऱ्याचा बाजरी, कपाशी, तुरीच्या पेरणीकडे कल राहण्याची शक्यता अधिक आहे. संकरित आणि सुधारित बाजरीच्या बियाण्यांपासून ९० दिवसांमध्ये पीक घेता येते.

त्यामुळे ऐन पावसात पीक सापडू नये म्हणून बाजरीची पेरणी शेतकरी उशिरा करतात. भात आणि नागली (रागी)च्या रोपांची पुनर्लागवड येत्या काही दिवसांत होईल. पाऊस होईल, तसे शेतकऱ्यांनी पेरण्या करणे पसंत केले आहे.

मात्र, यापुढील काळात पावसाने खंड दिल्यास दुबार पेरण्यांचे संकट घोंघावण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, भात व नागलीला विलंब झाल्याने उत्पादनातील घटचा प्रश्‍न तयार होणार नाही ना, अशी धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे.

विभागनिहाय खरिपाचे सरासरी क्षेत्र हेक्टरमध्ये, आतापर्यंत प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये आणि पेरणीची टक्केवारी अनुक्रमे पुढीलप्रमाणे असून, (कंसात गेल्या वर्षी १८ जुलैपर्यंत प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये दर्शविते) : कोकण- चार लाख १३ हजार ६१५- १ लाख १८ हजार ८९४.३४ (दोन लाख २१ हजार १९१),

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नाशिक- २० लाख ६४ हजार ६८८- १५ लाख ४१ हजार ९५७.७५ (१७ लाख ७७ हजार ३५४), पुणे- १० लाख ६५ हजार ४८- चार लाख ४९ हजार ८६२.४२ (साडेसात लाख), कोल्हापूर- सात लाख १८ हजार १७६- दोन लाख ८६ हजार २९४.३९ (पाच लाख ९९ हजार ४५९), छत्रपती संभाजीनगर- २० लाख ९० हजार १९८- १७ लाख ६६ हजार ५६८.८५ (१८ लाख ६० हजार २३०),

लातूर- २७ लाख ६६ हजार ९५४- २१ लाख ५० हजार ८६९.७८ (२४ लाख ५५ हजार ५५६), अमरावती- ३१ लाख ५८ हजार ८७२- २८ लाख ८० हजार ८१३.९१ (२९ लाख ४२ हजार २९३), नागपूर- १९ लाख १४ हजार ७६७- १२ लाख ३४ हजार ६३९.६४ (१२ लाख ९९ हजार ९०१).

नाशिक, नगर, सातारामध्ये टंचाईच्या झळा

राज्यात पावसाअभवावी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या झळा नाशिक, नगर, सातारा जिल्ह्यांत सर्वाधिक आहेत. नाशिक जिल्ह्यातील ६८ गावे आणि ३७ वाड्यांसाठी ५८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

गेल्या आठवड्यात ६७ गावे आणि ३६ वाड्यांसाठी ५३ टँकर सुरू होते. गेल्या वर्षीच्या १७ जुलैला एकही टँकर जिल्ह्यात सुरू नव्हता. नगर जिल्ह्यातील ५८ गावे आणि ३२६ वाड्यांना ५३, तर सातारा जिल्ह्यातील ५६ गावे व २७३ वाड्यांना ५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्हानिहाय टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे असून (कंसात जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या) : धुळे- १-० (१), नंदुरबार- १-२ (२), जळगाव- ३३-० (३५), पुणे- ४४-२२८ (३२), सांगली- ७-३१ (७), सोलापूर- ९-८८ (९), छत्रपती संभाजीनगर- २४-० (२२), हिंगोली- ८-० (९), नांदेड- १-० (२), अमरावती- ५-० (५), वाशिम- १-० (१), बुलढाणा- १९-० (१९). कोकण आणि नागपूर विभागांमध्ये सद्यस्थितीत एकही टँकर सुरू नाही.

विभागनिहाय आताची टंचाईची स्थिती

विभागाचे नाव टंचाईग्रस्त टँकरची संख्या

गावे वाड्या

नाशिक १६१ ३६५ १४९

पुणे ११६ ६२० १०२

छत्रपती संभाजीनगर ३३ ० ३३

अमरावती २५ ० २५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT