A blooming papaya in Tatya Rao Pawar's garden esakal
नाशिक

Nashik Agriculture News: खायदेच्या तात्याराव पवारांनी फुलवली पपईची बाग! किलोला 17 ते 27 रुपये भाव

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : तालुक्याचा दक्षिण पट्टा द्राक्ष पंढरी म्हणून ओळखला जायचा. निसर्गाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या नुकसानीने द्राक्ष उत्पादनात घट होत आहे. तालुक्यासह कसमादेतील शेतकरी प्रयोगशील आहेत.

खायदे (ता. मालेगाव) येथील तात्याराव पवार यांनी पपई शेतीचा प्रयोग यशस्वी केला. कष्ट व मेहनतीतून त्यांनी पपई बाग फुलवली. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यांच्या शेतातील पपईला घाऊक बाजारात १७ ते २७ रुपये किलो असा भाव मिळाला. (Khayde Tatyarao Pawar bloomed papaya garden 17 to 27 rupees per kg Nashik Agriculture News)

खायदे हे गाव गिरणा धरण पाणलोट क्षेत्राच्या पायथ्याशी आहे. धरणामुळे पुनर्वसन झालेला गाव व परिसरातील जमीन सुपीक व काळी कसदार आहे. शेती हा या गावाचा मुख्य व्यवसाय आहे. इथले शेतकरी ज्वारी, बाजरी, भुईमूग, तूर, मूग, मका, कुळीद अशी पारंपरिक पिके घेत असत.

फळशेतीकडे गावाने पाठ फिरवली होती. कालांतराने तरुण शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरत या भागात फळशेतीला चालना दिली.

सुरुवातीच्या काळात द्राक्ष उत्पादन घेतले जात होते. गारपीट व बेमोसमी पावसामुळे उत्पादकांना सातत्याने नुकसानीला सामोरे जावे लागायचे. त्यामुळे द्राक्ष उत्पादन घटले. आता शेतकरी इतर फळपिके घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

शेणखताचा वापर

गावातील तरुण शेतकरी तात्याराव पवार यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत पहिल्यांदा पपईची लागवड केली. सुरुवातीला एका एकरात पपई क्रमांक १५ हा वाण लावला आहे.

एकरभर प्रयोग यशस्वी झाल्याने पवार यांनी आणखी दोन एकरात लागवड केली. साकुरीझाप येथील रोपवाटिकेतून त्यांनी १४ रुपयांना एक याप्रमाणे रोपे खरेदी केली.

आठ बाय सहा फूट या अंतरावर त्यांनी रोपांची लागवड केली. रासायनिक खते कमी प्रमाणात वापरली. शेणखत मोठ्याप्रमाणावर वापरण्यात आले.

पवार यांच्या बागेतील एका झाडापासून ५० ते ६० किलो पपई निघते. एका एकरात ८०० ते ९०० झाडे लावली आहेत. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये लागवड केल्यानंतर पाच महिन्यात झाडाला फळ आले. लागवडीपासून आठ महिन्यानंतर पपईचे पीक काढणीला आले.

बागेची निगा, वेळेवर पाणी, खते दिल्यामुळे दर्जेदार पपईचे उत्पादन मिळाले. लागवडीचा खर्च एकरी ७० ते ९० हजार रुपये दरम्यान, आहे. एकरी ४५ ते ५० टन उत्पन्न मिळत आहे. घाऊक व्यापारी बांधावर जाऊन पपई खरेदी करत आहेत.

तोडणी, पॅकिंग व वाहतूक खर्च व्यापारी करतात. तालुक्यातील निमगुले, मळगाव, खायदे, साकुरी आदी भागात पपई उत्पादन मोठ्याप्रमाणावर घेतले जात आहे. योग्य नियोजन केल्यास झाडापासून तीन वर्षे फळे मिळू शकतात.

उपलब्ध पाण्यावर योग्य नियोजन केल्यास पपई शेती शेतकऱ्यांनी फायदेशीर ठरणारी आहे. पवार यांचा पपई शेतीचा प्रयोग कसमादेतील तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

"पपई बागेत पाण्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. लागवडीपासून आठ महिने पपई बागेची निगा राखली. अर्धा किलो ते दोन किलोपर्यंतचे फळ मिळते. चांगली मेहनत घेतल्यास इतर फळांपेक्षा पपई शेती निश्‍चित फायदेशीर आहे. पपई शेतीत पहिल्या वर्षी टरबूज, कांदे, भाजीपाला आदी आंतरपीक घेता येऊ शकते." - तात्याराव पवार, खायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT