Mangoes entered the market for the Akshaya Tritiya festival, one of the three and a half Muhurtas. Citizens shopping for pitchers in the second photo esakal
नाशिक

Akshay Tritiya : अक्षयतृतीयेसाठी फळांचा राजा खातोय भाव! बाजारपेठेत घागरी खरेदीसाठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा

Akshay Tritiya : साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेली अक्षय तृतीयेचा सण आज साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर घराघरांत होणाऱ्या पितरांच्या पूजेसाठी लागणाऱ्या पूजा सामग्रीच्या वस्तूंनी घोटी इगतपुरीच्या बाजारपेठा सजल्या आहेत.

या दिवशी होणारी सोने खरेदी लक्षात घेता सुवर्ण बाजारही हा मुहूर्त कॅश करण्याच्या तयारीत आहे. (king of fruits eats Bhav for Akshay Tritiya Crowd to buy pottery in market nashik news)

इगतपुरी तालुक्यासह नाशिक जिल्हा व खानदेशात अक्षय तृतीयेला महत्त्वाचे स्थान आहे. घराघरांत पूर्वजांच्या नावाने घागरी भरून विधिवत पूजा करून पितरांना भोजन देण्याची प्रथा आहे. यासाठी घराघरांत जोरदार तयारी सुरू आहे.

बाजारपेठेत गर्दी

अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंची दुकाने बाजारपेठेत थाटण्यात आली आहेत. या दुकानावर गर्दी होत आहे. घागरी बाजारात ६० रुपयांपासून ते ८० रुपयांपर्यंत मिळत आहेत. घागरीवर पूजेत ठेवले जाणारे साहित्य २५ रुपये ‌किलो पासून आहे.

केसर व बदाम आंब्यांना मागणी असून त्यांच्या किमती १०० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत आहेत. यासह केळीची व नागवेलीची पानेही विक्रीस आली आहेत. पूजा साहित्य व फुलांनाही मोठी मागणी आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

रत्नागिरीचा हापूस बाराशे रुपये डझन

अक्षय तृतीया म्हणजेच आखाजीनिमित्त घरोघरी पूर्वजांना आमरस पुरणपोळीचा नैवेद्य देणे व घागर भरण्याची परंपरा आहे. यंदा बाजारात फळांचा राजा म्हणजे आंबा दाखल झाला खरा पण भाव खाऊनच. खानदेशी खाद्य संस्कृतीत पुरणपोळी नेहमीच असते.

मात्र, आमरस चाखण्यासाठी आखाजीचीच वाट पाहिली जाते. रत्नागिरीचा हापूस आंबा ७०० ते १२०० रुपये डझन तर २०० ते २५० रुपये किलो तर केसर आंबा १५० ते २०० असा आणि बदाम आंबा १०० ते १४० रुपये प्रतिकिलो असा भाव खात आहे

"सर्वसामान्य महिला असो वा नोकरदार असो, अक्षयतृतीयेच्या सणासाठी अपेक्षा लावून असते. याच काळात सुट्याही असतात त्यामुळे एक वेगळाच आनंद मिळतो. सणाचा उत्साह आहे."

-आश्विनी सोनवणे, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT