Bird knitting Nest esakal
नाशिक

Nashik News : सुगरणीच्या घरट्यात ‘माळ मुनिया'ची विन; नांदुरमध्यमेश्‍वर पक्षीतिर्थातील चित्र

आनंद बोरा

नाशिक : वेगवेगळ्या ऋतुत विविध जातीचे पक्षी सभोवतालची परिस्थिती अन वातावरणाचा अंदाज घेत घरटी बांधायला घेतात. मऊ, उबदार, संरक्षण आणि कुणाच्या सहज नजरेला पडणार नाहीत अशा ठिकाणी नाजूक घरटी बांधतात. अनेक पक्षी दुसऱ्या पक्षांचे तयार घरटे स्वीकारतात. असाच प्रकार पक्षीतीर्थ नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्यात पाहावयास मिळाला. सुगरणीच्या घरट्यात ‘माळ मुनिया' ने विन करणे पसंत केले आहे. यातून घरट्यांसाठी आवश्‍यक वृक्ष आणि माळराने कमी होत असल्याचा संकेत मिळत आहे. (knitting of Mal Munia in sugaran bird nest at Nandur Madhyameshwar Pakshitirtha Nashik News)

सुगरण हा चिमणीच्या आकाराचा लहान दिसणारा पक्षी. त्याला पक्ष्यांमधील अभियंता आणि वास्तूविशारद संबोधले जाते. पिवळ्या धम्मक रंगातील हा पक्षी घरटी बांधण्याच्या कलेसाठी ओळखले जातात. या पक्ष्यांचा विणीचा हंगाम मे ते सप्टेंबर हा असतो. नराने बांधलेले घरटे पसंत पडल्यावर त्या नराशी मादीचे मिलन होते. मादी उर्वरित घरटे पूर्ण करते. हे घरटे गवत, कापूस, केस आणि इतर वस्तूंनी तयार केलेले आणि व्यवस्थित विणलेले असते.

मादी एकावेळी २ ते ४ अंडी देते. ती उबविणे, पिलांना खाऊ घालणे अशी कामे मादी करते. पण अर्धवट बांधलेल्या घरट्यांपैकी जर एकही घरटे मादीला पसंत पडले नाही, तर नर ते झाड अथवा तो संपूर्ण परिसर सोडून अन्यत्र नवीन घरटी बांधायला सुरू करतो. ते घरटे हा पक्षी सप्टेंबरमध्ये सोडून निघून जातो. मग रिकाम्या घरट्यात राहायला येतात, माळ मुनिया.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

भारतीय ‘सिल्व्हरबिल' नावाने माळ मुनिया ओळखला जातो. एस्ट्रिलिड फिंच हा मध्य पूर्व आणि भारतीय उपखंडातील कोरड्या प्रदेशात सामान्य निवासी प्रजनन करणारा हा पक्षी आहे. गवताळ प्रदेश आणि झाडी वस्तीमध्ये लहान कळपांमध्ये हे पक्षी खाद्य शोधातात. हिवाळ्यात दक्षिण भारतात आणि उन्हाळ्यानंतर उत्तर भारतात घरटी बांधतात.

पावसाळ्यात व हिवाळ्यात हे पक्षी विन करतात. पावसाळ्यात गवताचा एक अस्वच्छ गोळा करून खालील बाजूने आत जाण्यासाठी छोटे छिद्र केलेले घरटे ते बनवतात. कमी झुडूपांमध्ये, बहुतेक वेळा काटेरी बाभळीवर ते बघावयास मिळतात. हिवाळ्यामध्ये हे पक्षी स्वतः घरटी न बनविता सुगरणने सोडून दिलेले घरटे स्वतःच्या विनीसाठी ते वापरतात, असे प्रकार तुरळक असतात.

पक्षी असे का करतो?

सिल्व्हरबिल पक्षी असे का करतो? याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता, वृक्ष आणि माळराने कमी होत असल्याचे मुख्य कारण समोर आले. हिवाळ्यामध्ये शेतीकामांमुळे त्यांची घरटी असुरक्षित होतात. माळरानावरील गवत हिवाळ्यात काढले जात असल्याने पक्ष्यांची घरटी उध्वस्त होतात. त्यामुळे पक्ष्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणत दुसऱ्या पक्ष्याचे घरटे स्वीकारण्यास सुरवात केल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT