Officials and dignitaries of NCP from Sinnar taluka during a discussion at the NCP meeting at the government rest house in Sinnar. esakal
नाशिक

Kondajimama Avhad: शरद पवार समर्थकांचा उद्या सिन्नरला मेळावा : कोंडाजीमामा आव्हाड

सकाळ वृत्तसेवा

Kondajimama Avhad : पराभवाची भीती सतावू लागल्याने दडपशाहीच्या मार्गाने पक्ष फोडले जात आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे.

या दडपशाहीच्या प्रवृत्तीला संपवण्याचा निर्धार करून तालुक्यातील जनतेने शरद पवारांच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याचा निर्धार केला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी केले. (Kondajimama Avhad statement Sharad Pawar supporters to meet at Sinnar tomorrow nashik news)

येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. मविप्रचे संचालक कृष्णाजी भगत अध्यक्षस्थानी होते.

जिल्हा उपाध्यक्ष गोकूळ पिंगळे, दत्तात्रेय माळोदे, बाजार समितीचे माजी उपसभापती सोमनाथ भिसे, डॉ. भरत गारे व्यासपीठावर उपस्थित होते. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात व महाराष्ट्रात शरद पवारांशी झालेल्या सर्व घडामोडींबद्दल सर्वसामान्यांच्या मनात राग निर्माण झाला आहे.

तालुक्यातील समर्थकांसह अनेकांच्या या भावना असून सर्वांच्या आग्रहामुळे पवारांच्या समर्थनार्थ येत्या शनिवारी (ता.२२) सकाळी अकराला तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा मातोश्री नर्मदा लॉन्सवर होणार असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तालुक्यातील जनतेने सदैव शरद पवारांची पाठराखण केली असल्याचे कृष्णाजी भगत म्हणाले. पवारांच्या समर्थनार्थ तालुक्यातील सर्व जुन्या जाणत्या नेत्यांना एकत्रित आणून कार्यकर्त्यांची मजबूत मोट बांधावी, असे माजी नगरसेवक किरण मुत्रक व दत्तात्रेय माळोदे यांनी व्यक्त केले.

राजाराम मुरकुटे, प्रदेश सचिव रवींद्र काकड, संदीप शेळके, पी. जी. आव्हाड, दत्तात्रय डोंगरे, सगर विद्या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष दत्ता गोळेसर, किसान सेलचे अध्यक्ष तानाजी सानप, रामदास जायभावे यांनी चर्चेत भाग घेतला.

सुरवातीला भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओतून सोमय्या यांचा महिलांसंदर्भातील विद्रूप चेहरा समोर आल्याचे सांगत घटनेचा निषेध करून तसा ठराव माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी मांडला.

त्यास उपस्थित सर्वांनीच एकमुखाने मंजुरी दिली. दगू भुजबळ, खंडेराव सानप, विष्णू पाबळे, तुकाराम मेंगाळ, संदीप ताजणे, सेवानिवृत्त प्रा. राजाराम मुंगसे, दीपक सोनवणे, नीलेश मंजुळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व शरद पवारांचे समर्थक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT